शिवरायांचे आठवावे रुप !

शिवरायांचा आठवावा प्रताप !!

 शुक्रवारदि जून२०२० दुठीक १२ वाजता.

 MMQ FB पेजवर थेट LIVE !!

 सादरकर्ते ज्येष्ठ कीर्तनकर्ते श्रीचारुदत्त आफळे.

६ जून १६७४ शिवराज्याभिषेक दिन,

एक असा असामान्य दिवस ज्याचे महाराष्ट्रावर, भारतावर आणि पर्यायाने जगावर दूरगामी परिणाम झाले.

श्री छत्रपती शिवराय हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत अणि आज त्यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून त्यांचेविचार खऱ्या अर्थाने जाणून घेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र मंडळ कतार कार्यकारिणी समिती २०१९,२०२० आपणासमोर हाउपक्रम घेऊन येत आहे.

सुमारे चारशे वर्षांची कीर्तनाची परंपरा लाभलेल्या घराण्यात जन्म घेऊन, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर ५००० च्यावर कार्यक्रम केलेले तसेच बालगंधर्व पुरस्कार, मास्टर दीनानाथ पुरस्कार, राष्ट्रीय कीर्तन सम्राट अशा असंख्यपुरस्कारांनी सन्मानित झालेले श्री चारुदत्तबुवा आफळे यांच्यासारखे व्यक्तिमत्व आपल्याला या कार्यक्रमानिमित्त लाभलेआहे.

या निमित्ताने शिवरायांच्या दैवी गुणांचे स्मरण आणि या राज्याभिषेकाचे भारतावर आणि जगावर झालेले परिणाम याविषयावर चिंतन व्याख्यान ऐकूया, शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभ पर्वदिनी !

चला तर मग भेटूया, दिनांक ५ जून २०२० रोजी, दुपारी ठीक १२ वाजता महाराष्ट्र मंडळ कतार च्या फेसबुक पेजवर थेट LIVE !!

अधिक माहितीसाठी संपर्क : 

संजय पाटील : ३३१४६८३१

पराग सोनावणे : ७७२९५९२०

श्वेता कोष्टी : ५५५९९७२४