कर्ण – पराग सोनवणे

काय लिहावे आणि कास लिहावे हेच समजत नव्हते किंबहुना कशावर लिहावे हे हि   समजत नव्हते, मी काही असा लेखक  पण नाही  कि काही दर्जेदार असं लिहेल. शांतपणे विचार  करत पडलो होतो मनात महाभारत कालीन पात्रांचा विचार मनात आला.  महाभारत एक महान असे धार्मिक पौराणिक ऐतेहासिक असे एक महाकाव्य महान असे योध्यांचे महाभारत अफाट नातीगोती चा गुंता असलेले महाभारत, साऱ्या जगाचे तत्वज्ञान कोळून प्यालेल्या परमज्ञानी विश्वरूपी योगेश्वराचे महाभारत, आपल्या कठोर अश्या प्रतिज्ञेने संपूर्ण आयुष्य आपल्या प्रतिज्ञेवर ठाम असलेल्या आणि मृत्यू  च्या शेवटच्या क्षणापर्यंत हस्तिनापूर च्या राजगादी शी प्रामाणिक असलेल्या मा गंगा पुत्र पितामह भीष्म याचे महाभारत, कि सर्व विद्या संपूर्ण सर्वश्रेष्ट  सर्व विद्या निपुण  राजगुरु द्रोणाचार्य याचे महाभारत, अमरत्व हा शाप कि वरदान ह्या व्यवहारचनेत कायम अडकून पडलेल्या अश्वत्थामा चे महाभारत, कि प्रामाणिक आणि एक उत्तम शिष्य एकलव्याचे  महाभारत, पुत्रप्रेमात आंधळ्या झालेल्या  धुतराष्ट्र चे महाभारत कि कौंतेय पुत्र आणि माद्रेय पुत्र  पांडवांचे महाभारत.  साऱ्या जगाला एक जीवनाविषयी  जगण्याविषयी चे मार्गदर्शक तत्वज्ञान साक्षात श्रीकृष्ण कडून अर्जुनाला मिळाले त्या क्षणाचे साक्षीदार असलेले महाभारत …

असे हे महाभारत ज्यामध्ये मला सदैव आणि एक सुप्त असे आकर्षण राहिले आहे ते म्हणजे एक सूतपुत्र, परम पराक्रमी, सर्वश्रेष्ठ  धनुर्धन, एक जिवलग मित्र दानशूर, आणि आजही त्याची ओळख ज्या मातेच्या नावाने होते  असा राधेय. हो राधेय फक्त राधेय आणि राधेय.

नियती चे असे कुठलेही लिखित नियम नसतात किंवा ते आदर्श अशा वचनांवरून हि ठरत नसतात किंबहुना ते जीवनातल्या येणाऱ्या अनुभववनवरून ठरत असतात .. आणि म्हणूनच एका राजकुलात जन्मलेला एक  नवजात अर्भक नकळत पण एका  सूतपुत्र च्या घरात आपले बालपण  घालवतो आणि आपल्या  पालनकर्ते राधा आणि अधिरास यांचे यांनी केलेल्या संगोपनाचे आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण पंचक्रोशी त  आपल्या मातेच्या नावाने म्हणजेच राधेय या नावाने  आदर्श पुत्र म्हणून ओळखला जातो. आयुष्यात येणारे कटू अनुभव हे माणसाचे खरे मार्गदर्शक असतात. असं म्हणतात अपयश आणि विष हे चघळायचे नसते ते सरळ पचवायची असते भलेही त्याचे दीर्घकालीन परिणाम सोसावे लागले तरी चालेल आणि कदाचित म्हणूनच हा सूतपुत्र महापराक्रमी एक महान योद्धा राधेय त्याच्या आयुष्यात घडला.

मैत्रीची व्याख्या करता येत नाही, मैत्री हि निर्मल मनाची आणि विश्वासाची असते .. आयुष्यातले अपमान अवहेलना  पचवत राधेय चे जीवन व्यतीत होत होते अशा वेळी त्याला मैत्री ची साद  घातली ती धुतराष्ट्र पुत्र दुर्योधनाने, आणि  आपल्या कर्तृत्वाने हा राधेय कधी अंगराज  कर्ण झाला ते कळलं  च नाही ..
सूतपुत्र म्हणून शस्र विद्येचा अभ्यास मुकलेला राधेय, कि गुरु ची समाधी  भग्न होऊ नये म्हणून भुंग्या मुळे  भळभळती जखमेच्या वेदनांना आपल्या जीभ आणि ओठांमध्ये दाबणारा हा राधेय मला आदरयुक्त  नेहमी सर्वशतीशाली वाटला.
 
स्वतःच्या श्रेष्ठत्वाची जाणीव हि साक्षात श्रीकृष्णा  कडून झाल्यावर काय विचार आले असतील ह्या सूर्यपुत्र च्या मनात, काय वाटले असेल त्याला कि तो राधेय नसून कौंतेय आहे. कुरु कुळातील  सर्वात जेष्ठ म्हणून राजगादी चा प्रथम वारसदार कर्ण 
असंख्य खङग शरीरावर चालावेत आणि भळाभळा रक्त त्या जखमांमधून निघावे असे ते शब्द ह्या राधेय च्या मनाला जखमा करून गेले असतील. त्या मनाला झालेल्या जखमा खरंच का त्या भरून निघाल्या असतील? हस्तिनापूर ची राजगादी खुणावत असताना देखील आपला मित्र दुर्योधन  याचबरोबर ठाम उभा असलेला कर्ण  खरोखर मनात एक घर करून राहतो.

निसर्ग आणि नियती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.  कुरुक्षेत्र वर  झालेले युद्ध हा पृथ्वी वरचे सर्वात विनाशकारी युद्ध म्हणून ओळखलेले गेले आहे. बदल हा निसर्ग नियम आहे  आणि हे बदल वाहत्या नदी च्या पत्रासारखे असते  आयुष्य पण असेच काहीतरी वाहत्या नदीसारखे समांतर वाहत असते. ते आपल्या हातात नसते,  युध्य हे अटळ होते त्यात कुठलाही बदल हा अशक्य होता, ऐन युद्धात राजमाता कुंतीला अर्जुनाला सोडून तिच्या चार पुत्रांना जीवनदान देताना किती वेदना ह्या सूर्यपुत्र ला झाल्या असतील.
स्वर्गलोकात अमृत प्राशन  करणारा  देवांचा राजा इंद्रदेव जेव्हा ह्या मनुष्य योनीतील एका योध्याला त्याची कवच कुंडले मागणारा  आणि तितक्याच प्रामाणिकपणे मनापासून आपली कवच कुंडले दान करणारा कर्ण  खरोखर आकलनापलिकचा आहे.

युद्धशास्राचे काही नियम हे त्याकाळी हि होते. आणि ते वेळोवेळी हे तोडले जात होते. त्याला आपण कृष्णनीती सुद्धा म्हणू शकतो, गुरु, द्रोण पितामह, असे कितीतरी महायोध्ये यांनी आपली प्राणांची आहुती ह्या युद्धात दिली,
पण तो दिवस नक्कीच वेगळा दिवस असणार , ह्या पृथ्वीतलावरचे सर्वात महान योध्ये समोरासमोर येणार होते.
एकाचे सारथ्य साक्षात योगेश्वर श्रीकृष्ण करणार होता तर एकाचे सारथ्य मद्र राज शल्य करणार होता. एका बाजूला होता कृष्णाचा प्राणप्रिय एकाग्र चित्ती एक महान असा योद्धा पार्थ तर दुसरीकडे दानशूर, सूर्यपुत्र, कौंतेय, अंगराज, एक असा  जिवलग मित्र कि आपल्या जीवाची हि पर्वा ना बाळगणारा , खरा राधेय 
 
 ह्या घनघोर युद्धाला सत्य आणि असत्य ची लढाई म्हणायचे का कृष्णयोग नीती म्हणायचे हे ठरवणे माझ्यासारख्याला आज हि ठरवणे खूप कठीण जात आहे.

कुरु वंशात राजगादी चा सर्वात प्रथम वारसदार म्हणून कर्ण ला माहित असून हि मित्रा  ला दिलेला शब्द हा अंतिम शब्द म्हणून रणांगणावर कशाशीही पर्वा न  करणारा कर्ण  आणि सूत  पुत्र  चा सारथ्य म्हणून ऐन युद्धात सारथ्य सोडणार शल्य …. का ह्या सगळ्या वेदना हे दुःख एकट्या कर्ण च्या वाट्याला आलेत.
का हा राधेय पुन्हा  एकदा  एकटा पडला किती  क्रूरपणा नियती ने त्याच्याशी मांडला

रथाचे रुतलेले चाक काढण्याच्या प्रयत्नात असलेला निशस्त्र कर्ण  एका क्षणात समोरील प्रतिस्पर्धी असलेल्या अर्जुनाकडून आलेल्या बाणाने कधीच कर्ण चा कंठभेद झाला
सत्य आणि असत्य, धर्म आणि अधर्म च्या  ह्या युद्धात एक महान असा सूर्यपुत्र, दानशूर, अंगराज, कौंतेय आणि राधेय कधीच आपल्या अनंताच्या प्रवासाला निघून गेला.  
 
आणि मग पुन्हा एक प्रश्न मला पडला कि नियती एखाद्याविषयी इतकी कठोर आणि निष्टुर का असू शकते ?
 
पराग सुरेशराव सोनवणे 

Subscribe to eMagazine updates!

5 Thoughts to “कर्ण – पराग सोनवणे”

  1. SANDESH PANGERKAR

    सुंदर पराग

  2. स्वाती पांडव बेंद्रे

    खूप अभ्यास करून लिहिलाय लेख. शेवट अगदी बोलका. लेखनासाठी कर्ण हा विषय निवडणे , हेच मुळात अभिनंदनस्पद

  3. Soniya parsekar

    Khuuupach sundar

  4. Mohan Patil

    mast Parag, Keep it up

  5. Atul Deswandikar

    Felt like reading Mrutunjay !!! Mastch Parag …keep it up ….

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.