हे देवा धन्यवाद तुझे
हे देवा धन्यवाद तुझे
या जगात करोना आणलास
आम्हा माणसांना अद्दल घडवलीस
सर्वांना एका घरात पाठवलेस
व्यक्तीयत आरोग्याची आठवण दिलीस
हे देवा धन्यवाद तुझे
हे देवा धन्यवाद तुझे
आम्ही त्यावेळी माणसात होतो
डोक्यावर जरीचा कपडा होता
इज्जतीत फार नेटका होता
राहायला मोठा वाडा होता
हे देवा धन्यवाद तुझे
हे देवा धन्यवाद तुझे
तेव्हा विटी–दांडू चा खेळ होता
आत्या वहिनीचा मेळ होता
डोक्यावरुन पदर पडत नव्हता
घरात संस्काराची शाळा होती
हे देवा धन्यवाद तुझे
हे देवा धन्यवाद तुझे
तेव्हा मोठ्यांना किंमत होती
आयुष्य म्हणजे गंमत नव्हती
माणसांना एकमेकांची ची गोडी होती
नात्यांची सर्वांना ओडी होती
हे देवा धन्यवाद तुझे
हे देवा धन्यवाद तुझे
जेव्हा शेतकरी राजा होता
त्याच्या शब्दाला किंमत होती
त्याच्या मेहनतीला मोल होते
नव्हता होत पर्यावरणाचा नाश
हे देवा धन्यवाद तुझे
हे देवा धन्यवाद तुझे
आता आम्हाला अक्कल आली
घराला जळू घर पण आलाय
नात्या गोत्या यांची वाढवलाय संवाद
एकमेकांच्या सुख दुखांचे झाले वाटण
हे देवा धन्यवाद तुझे
हे देवा धन्यवाद तुझे
बर्गर पिझ्झा पास्ता दूर पळाले
आई मावशीचा आला मेनू
तोंडाला आली चव वेगळी
आजारपण पळाले दूर आता
हे देवा धन्यवाद तुझे
हे देवा धन्यवाद तुझे
नाही धावणार पैशाच्या मागे
नाही करणार पर्यावरणाची नास
नाही करणार प्रकृतीची हेळसांड
नाही करणार अनावश्यक खर्च
हे देवा धन्यवाद तुझे
हे देवा धन्यवाद तुझे
कारण या जगात तु करोना आणलास!
मनिष शांतीलाल शहा