नमस्कार मंडळी,

महाराष्ट्र मंडळ कतार कार्यकारिणी समिती 2023-24 घेऊन येत आहोत पारंपारिक कार्यक्रम, 


!! मकरसंक्रांत – 2023 !!


मकर संक्रातीचा सण गोडवा जपण्याचा, ऋणानुबंध वाढवण्याचा…


मंडळी, चला तर मग नववर्षातील या पहिल्या सणानिमित्त एकत्र येऊन साजरा करु सोहळा खास हळदी कुंकवाचा आणि सोबत बोरन्हाण बालक/ बालिकांसाठी.


दिनांक: 03 फेब्रुवारी 2023
स्थळ: माएस्ट्रो हॅाल स्किल्स डेव्हलपमेंट सेंटर, दोहा.
गुगल नकाशा स्थान – https://goo.gl/maps/ehPZ8BAnbvuFC73a7
वेळ : सकाळी 11:00 ते दुपारी 03:00



कार्यक्रमाची रूपरेषा,


1. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे उद्घाटन
2. हळदीकुंकू आणि संक्रांतीचे “वाण” 
3. बोरन्हाण 


”बोरन्हाण” हा कार्यक्रम फक्त वय वर्षे पाच पर्यंत बालक / बालिकांसाठी आयोजित केलेला आहे. 


टिप 1: सर्व सभासदांसाठी ऑनलाइन नोंदणी फॉर्म भरणे अनिवार्य असेल. ऑनलाइन फॉर्म वर प्राथमिक सभासद माहिती, कार्यक्रमाला उपस्थित महिला सभासदाचे नाव आणि ”बोरन्हाण” बालक / बालिकांची संख्या नोंदणी आवश्यक आहे.
ऑनलाइन नोंदणी फॉर्म साठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा – https://forms.office.com/r/jRFVj2ccwf


ज्या MMQ सभासदांकडे, वर्ष 2023 (नूतनीकरण / नवीन) कौटुंबिक सभासदत्व (FAMILY MEMBERSHIP) असेल ते सर्व सभासद वाणासाठी पात्र असतील. 


नवीन सभासदत्व आणि सभासदत्वाचे नूतनीकरण कार्यक्रमाच्या ठिकाणी करता येईल.


आदरणीय महिलांना विनंती आहे की त्यांनी आपला पारंपारिक मकरसंक्रांतीचा पोशाख (काळी साडी आणि मराठमोळी नथ) परिधान करावा.


टिप 2: हा कार्यक्रम मंडळाच्या सन्मानीय महिला सभासद आणि मुलांसाठी आहे याची कृपया नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी संपर्क :
सौ. रचना चौधरी – 50826953 
सौ. अमृता पाटील – 55460162 
सौ. विद्या मोगारे – 55812265
सौ. मानसी (गायत्री) मोडक – 33745692
श्री. मनीष शाह – 55436537  
श्री. अजय ढोले – 33743576
श्री. सिद्धेश झाडे – 66049690 
श्री. निलेश वैद्य – 55119943
श्री. अनिल कदम – 77661503


आपली कृपाभिलाषी, 


कार्यकारिणी समिती 2023,2024
महाराष्ट्र मंडळ, कतार.
ई-मेल : qatarmmq@gmail.com
वेबसाइट: www.mmqatar.com
फेसबुक ग्रुप: @ Maharashtra Mandal Qatar
WhatsApp # 50203931