#Repatriation

Vande Bharat Mission

आपणा सर्वांना कळविण्यास आनंद होत आहे की बऱ्याच दिवसांपासून MMQ कार्यकर्ते व स्वयंसेवकांची मेहनत अखेर पूर्णत्वास आली. 
महाराष्ट्र मंडळ कतारच्या वतीने कतार मधील अडकलेल्या भारतीयांना परत मायभूमीत परतण्यासाठीची मोहीम गेले काही आठवडे राबविण्यात आली होती. यासाठी इंडिगो चार्टर्ड विमानांचे आयोजन करण्यात आले. 
दोहा कतार येथील भारतीय राजदूतावास व भारतीय सांस्कृतिक केंद्र ( इंडियन कल्चरल सेंटर) यांच्या सहकार्याने खोळंबलेल्या महाराष्ट्रीय नागरिकांसाठी चार विशेष विमाने अनुक्रमे मुंबई व नागपूर साठी दिनांक ३, ४ आणि ९ जुलै २०२० रोजी रवाना झाली ज्यात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व छत्तीसगड येथील जवळपास ८०० खोळंबलेल्या प्रवाशांनी प्रवास केला.
या व्यतिरिक्त भारतीय राजदूतावासाच्या वंदे भारत मिशन अंतर्गत राबवलेल्या विमान व्यवस्थापनेमध्येही मंडळाने हिरीरीने हातभार लावला.
महाराष्ट्र मंडळ कतारच्या अध्यक्षा सौ.नीलांबरी सुशांत सावर्डेकर यांनी उल्लेखिल्याप्रामाणे “महाराष्ट्र मंडळ कतारने आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून हा उपक्रम राबविला व या उपक्रमाअंतर्गत अतिशय माफक दरात तिकिटे,  गरजू कामगार बंधूंना एअरपोर्टसाठी मोफत बस सेवा, मूलभूत गरजा असलेली अन्न-औषधे या व अशा विविध समाजपयोगी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. या सर्व समाजपयोगी प्रकल्पातून मंडळाने खऱ्या अर्थाने रौप्यमहोत्सव साजरा केला.”
भारतीय दूतावासात नोंदणी केलेल्या महाराष्ट्रीय नागरिकांमधूनच प्राधान्यक्रमाने प्रवाशांची निवड करण्यात आली. गरोदर स्त्रिया, आपत्कालीन आरोग्यसेवेची निकड असलेले रुग्ण, रोजगार गमावलेले कामगार व वरिष्ठ नागरिक अशा प्रवाशांना यामध्ये प्राधान्य देण्यात आले. 
या कामी भारतीय राजदूतावास, कतारमधील भारतीय राजदूत माननीय श्री. पी. कुमरन, कौंसिलिंग अधिकारी श्री. राजेश कांबळे, भारतीय सांस्कृतिक केंद्र उपाध्यक्ष श्री. विनोद नायर, शिक्षण आणि सांस्कृतिक समन्वयक डॉ. नयना वाघ यांचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले.मंडळ त्यांचे मनापासून आभारी आहे.
तसेच या समाजपयोगी उपक्रमामध्ये मंडळाच्या अध्यक्षा सौ. नीलांबरी सावर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली खालील कार्यकर्त्यांची मोलाची साथ लाभली – 
१) उपाध्यक्ष- संतोष साळुंखे
२) चिटणीस- संजय पाटील
३) सहचिटणीस- पराग सोनवणे
४) खजिनदार- अतुल देसवंडीकर
५) समिती सदस्य- श्वेता कोष्टी
६) समिती सदस्य- सुजित खनलोसकर
७) समिती सदस्य- निलेश पार्सेकर
८) समिती सदस्य- सागर मांणगावकर
९) समिती सदस्य- अजय ढोले
१०) स्वयंसेवक- सुशांत सावर्डेकर
११) स्वयंसेवक- विकास ठाकरे
१२) स्वयंसेवक- श्रेया पाटील 
१३) स्वयंसेवक- श्वेता आणि गौरव दारोकर
१४) स्वयंसेवक- वैष्णवी साळुंखे
१५) स्वयंसेवक- अमित पराड 
१६) स्वयंसेवक- मुग्धा सरनाईक
१७) स्वयंसेवक- आरीफ मुकादम
१८) स्वयंसेवक- शैलेश शिंदे
१९) स्वयंसेवक- अदिती गायकवाड
२०) स्वयंसेवक- प्रणव शिंदे
२१) स्वयंसेवक- प्रसाद कुलकर्णी
२२) स्वयंसेवक- सुनील डकुआ
२३) स्वयंसेवक – आनंद खांझोडे
२४) स्वयंसेवक- केदार आफळे
२५) स्वयंसेवक- कैलाश थोरात
२६) स्वयंसेवक- सूर्या नामदुरी
२७) स्वयंसेवक- सचिन टेंभूळकर
२८) स्वयंसेवक- मनोहर खरात
२९) स्वयंसेवक- गजानन रावण
३०) स्वयंसेवक- नितीन व नम्रता तावडे
३१) स्वयंसेवक- सुनील साखरे
३२) स्वयंसेवक- अनिरुद्ध सोनगिरे


या व अनेक स्वयंसेवकांच्या हातभारामुळेच मंडळ हे शिवधनुष्य पेलू शकले. वरील सूचिमध्ये कोणाचेही नाव अनवधानाने राहून गेले असल्यास
मंडळाकडून या सर्व स्वयंसेवकांना तसेच वेळोवेळी आपल्या शुभेच्छांमधून आमचे मनोबल वाढविणाऱ्या अगणित सभासदांना आमचा सलाम.🙏🙏🙏
या सर्व उपक्रमातून मंडळाचे सर्वच स्थरांतून (राजकीय आणि अराजकीय) आणि भारतीय आणि कतार प्रांतातून कौतुक होत आहे, त्या सर्वांचेही आभार. अशीच कौतुकाची थाप पाठीवर राहू दे आणि आम्हास महाराष्ट्र, भारत आणि कतारसाठी असे अनेक समाजपयोगी उपक्रम राबवण्याचे बळ मिळत राहू दे हीच सदिच्छा…

 *आपले मंडळ, आपली संस्कृती !* 
 *एक अतूट नाते मराठी मनाशी !!* 

 *कार्यकारीणी समिती २०१९ – २०२०* 
 *महाराष्ट्र मंडळ कतार.*

In The News

Doha-based group charters flights to Mumbai, Nagpur to help stranded Indians get home

Read More

कतारमध्ये महाराष्ट्राचा डंका; ‘त्यांची’ मायभूमीची वाट केली सुकर

Read More

Maharashtra Mandal repatriates about 500 Indians to Mumbai, Nagpur

Read More

Travelers Story

Subscribe to eMagazine updates!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.