मातृदिनानिमित्त दि. ८ व ९ मी रोजी संपन्न झालेल्या “YUMMY BY MUMMY” या ऑनलाईन पाककृती स्पर्धेला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल कार्यकारीणी समिती २०१९-२०२० आपले आभारी आहे. तब्बल ४४ सुगरण गृहिणींच्या भरघोस प्रतिसादानंतर असे कार्यक्रम आयोजित करण्याची आमची जबाबदारी ही अजून वाढली असून असे अनेक ऑनलाईन नवीन समाजप्रबोधनपर आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला अजून स्फूर्ती मिळाली आहे.
या स्पर्धेच्या विजेत्यांची यादी खालील प्रमाणे :-
१) प्रथम पारितोषिक- प्रज्ञा उमराणी
२) द्वितीय पारितोषिक-(विभागून)
रुपाली पाठक / शोभा इंगवले.
३) तृतीय पारितोषिक-(विभागून)-
रुपल शहा / आशा कर्डीले.
४) उत्तेजनार्थ पारितोषिक-(विभागून)-
पल्लवी गर्गे / दीप्ती पोतनीस.
पुनश्च एकदा विजेत्यांचे अभिनंदन आणि सर्व स्पर्धकांचे मन:पूर्वक आभार.🙏🙏🙏
या स्पर्धेत भाग घेतलेल्या आपण सर्वच जणी खऱ्या अर्थाने विजेत्या आहात. आपणं सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जी मेहनत घेतली व अतिशय वेगवेगळ्या अभिनव आणि तितक्याच रुचकर पाककृती सादर केल्या त्याबद्दल कौतुकास पात्र आहात. महाराष्ट्र मंडळ आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करीत आहे.
पुनःश्च धन्यवाद !!
आपली विश्वासू,
कार्यकारीणी समिती २०१९ , २०२०
महाराष्ट्र मंडळ कतार