ती झेप त्या स्वातंत्र्यवीराची , ती झेप त्या तळपत्या सूर्याची
ती झेप त्या राखेतून उडणाऱ्या पक्षाची, ती झेप होती एका निखाऱ्याची
झेप घेऊन मृत्यूला दिली तुम्ही मात
आणि लोकांनी दिली तुम्हाला साथ
लोकमान्य असोत वा आगरकर
सर्वच होते तुमच्या सोबत
कारण ती झेप होती एका निखाऱ्याची
सर्वांच्या जिवाभावाच्या स्वातंत्र्यवीराची
झेप घेतल्यावर अटक झाली,
तरीही तेच स्मित हास्य तुमच्या गाली
काय होता तो आत्मविश्वास,
आत्म्यास हि वाटावी लाज
तरीही कोणीही धरिली नाही आजवर,
तुमच्या विचारांची कास
आणि म्हणूनच आली आठवण आज
कारण ती झेप होती एका निखाऱ्याची
सर्वांच्या जिवाभावाच्या स्वातंत्र्यवीराची
ब्रिटिश म्हणाले ५० वर्षांची शिक्षा होईल,
तुम्ही हसत म्हणाले त्या आधीच मातृभूमी स्वतंत्र होईल,
त्याकाळी काळ्या पाण्याची होती शिक्षा तुमची,
आणि आता साध पाणी भरल तरी कंबर दुखते आमची
आणि म्हणूनच आली आज आठवण तुमची
कारण ती झेप होती एका निखाऱ्याची
सर्वांच्या जिवाभावाच्या स्वातंत्र्यवीराची
परिस्थिती खरोखरच हतबल आहे तात्या
क्षुल्लक कारणा करता लोक करताहेत आत्महत्या
ठाऊक आहे तुमच्याशी कोणाचीच तुलना नाही होऊ शकत
सांगा न तात्या खरंच तुम्ही परत नाही का येऊ शकत
आणि म्हणूनच आली आठवण आज
कारण ती झेप होती एका निखाऱ्याची
सर्वांच्या जिवाभावाच्या स्वातंत्र्यवीराची
खरंच ती झेप होती एका स्वातंत्र्यवीराची
ती झेप होती एका तळपत्या जाज्वल्य सूर्याची
ती झेप होती एका राखेतून उडणाऱ्या पक्षाची
ती झेप होती एका धगधगत्या निखाऱ्याची
कवी आपलेच,
कौस्तुभ कोठीवान