“आजादी का अमृत महोत्सव “ अंतर्गत महाराष्ट्र मंडळ कतार कार्यकारणी 2021 आयोजित “महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थाचे प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम-२०२१”….
या कार्यक्रमाचे १७ सप्टेंबर २०२१ रोजी आयसीसी अशोक हॉलमध्ये सादरीकरण झाले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन भारताचे राजदूत डॉक्टर दीपक मित्तल आणि आणि डॉक्टर सौं. अल्पना मित्तल ह्यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महाराष्ट्रीयन संस्कृतीप्रमाणे औक्षण करून आणि लेझीमच्या गजरात झाले. तसेच त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात कतार आणि भारताच्या राष्ट्रगीताने आणि” महाराष्ट्र गीताने “ झाली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रक्षेपण करण्यात आले. त्यामध्ये गणेश वंदना, मंगळागौरीचे खेळ, लावणी, कोळी नृत्य तसेच छत्रपती शिवाजी राजे यांना श्रद्धांजली असे कार्यक्रम साकारण्यात आले.
नृत्य वयोगट ३ ते १२ मधील सहभागी सदस्यांचे व्हिडिओ “महाराष्ट्र मंडळ कतार facebook” वर प्रदर्शित करण्यात आले.
महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सेनानी चे चित्रप्रदर्शन करण्यात आले होते तसेच महाराष्ट्रातील रुचकर आणि चविष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडण्यात आले होते आणि त्याचा अस्वाद महाराष्ट्र मंडळ कतार येथील सभासदांना उपभोगण्याची संधी देण्यात आली.
महाराष्ट्र मंडळ कतार येथील सभासदांनी उदंड प्रतिसाद देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल महाराष्ट्र मंडळ कतार कार्यकारणी समिती 2021 शतशः आभारी आहे.
या कार्यक्रमाची झलक छायाचित्रांच्या माध्यमातून…..