हुतूतू… हुडूडू… चेडूयुडू… वंडीवडी… कोनवरा, साबरगण्णा… झाबर गंगा, सौची पक्की
तुम्हाला लक्षात आलेच असणार कुठला खेळ आहे हा???
*इंडियन स्पोर्ट्स सेंटर (ISC) ही एक कतार येथील भारतीय राजदुतावासाच्या अख्त्यारीतील महत्त्वाची संस्था असून त्यांनी भारतातील पारंपारिक विविध खेळाची ‘माहिती प्रात्यक्षिक’ आयोजीत केली होती.
सदर ची प्रात्यक्षिके ८ ऑक्टोबर २०२१ या ह्या दिवशी क्रीडा मैदानावर सादर करण्यात आली. यासाठी महाराष्ट्रातील या मातीतील पारंपारीक, लोकप्रिय व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खेळल्या जाणाऱ्या “कब्बडी” ह्या मराठमोळ्या खेळाचे प्रात्यक्षिक दाखविण्याचा मान महाराष्ट्र मंडळ कतारच्या संघाना मिळाला.
त्यातील काही क्षण कॅमेरातून…..