|| अंश माझा ||
चिमुकल्या पाऊलांनी आली चांदणी
बनून सावली माझी, आली माझीया अंगणी
अहोभाग्य आमचे तू घेतला जन्म
करशील रोशन तू आपुला वंश
तू आहेस माझाच अंश
कैक स्वप्ने पहिली या नयनी ,
तयांच्या पूर्ती करीन काळजाचं पाणी
जाणशी तू कष्टाविना ना मिळे फळ
कष्टाशी तस आपलं नातच जुन
तू आहेस माझाच अंश
करण्या पूर्ण तंव मनोरथ
करशील तू हि परिश्रमाची उधाण
जेणे होईल सार्थक माझे हे जीवन
तू आहेस माझाच अंश
येतील जीवनी अनेक वादळवाटा
नच डगमगू, न फिरणे मागे आता
भरुनी ओंजळीत विश्वास माझा
लेवुनी पंख घारीचे घे उडाण तू उंच नभा
तंव पाठीशी आशिष माझा
तू आहेस अंश माझा
– वैशाली सुरेश