आयुष्यात आई म्हणून जगून बघ – प्रज्ञा पांडे

तिच्या आधी उठून बघ तिच्या नंतर झोपून बघ
तिने दिली शिकवण तुला त्या संस्काराने वागून बघ
अन एकदा तरी आयुष्यात आई म्हणून जगून बघ ||1||

किती लावते माया तुला कधी माया तिला लावून बघ
तुमच्यासाठी सारं मागते कधी तिच्या साठी मागून बघ
अन एकदा तरी आयुष्यात आई म्हणून जगून बघ ||2||

थंडी वाऱ्या पावसां मधी तिच्या सारखं राबून बघ
सकाळ दुपार रात्री बेरात्री तिच्या सारखं जागून बघ
अन एकदा तरी आयष्यात आई म्हणून जगून बघ ||3||

थकत नाही कधी तरी निवांत तिला बसवून बघ
दोन शब्द बोल प्रेमाचे मनमोकळं हसवून बघ
अन एकदा तरी आयुष्यात आई म्हणून जगून बघ||4||

तूच माझा स्तोत्र प्रेरणेचा कधी तिला सांगून बघ
कधी तरी तिच्या साठी दीर्घायुष्य मागून बघ
अन एकदा तरी आयुष्यात आई म्हणून जगून बघ ||5||

प्रज्ञा पांडे
फोन नंबर :33684385

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top