नमस्कार मंडळी 🙏

अखंड हिंदुस्थान गातसे,
त्या शौर्याची गाथा…
स्वातंत्र्याच्या सुर्या चरणी,
सदैव आमुचा माथा….

हिंदहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन करून महाराष्ट्र मंडळ कतार कार्यकारिणी समिती २०२१, २०२२ घेऊन येत आहे,

MMQ ऑनलाइन कट्टा २०२१, पुष्प – तिसरे
”सावरकर – एक विचारपर्व”
प्रमुख वक्ते:- ज्येष्ठ रंगकर्मी श्री. शरद पोंक्षे

शुक्रवार, दिनांक २८ मे २०२१ सकाळी ठीक ११.०० वाजता
Zoom तसेच MMQ FB पेजवर थेट लाईव्ह !!!

ZOOM LINK : https://us02web.zoom.us/j/6620503584?pwd=TjBZM2M1R1dYdUZyR3pwSGZLUW1PUT09

ZOOM ID : 662 050 3584
PASSCODE : MMQ

महान देशभक्त, अद्वितीय क्रांतिकारक, ज्वालाग्राही साहित्यिक, थोर नाटककार, कुसुमकोमल कवी, ओजस्वी इतिहासकार, तत्वनिष्ठ राजकारणी, प्रेरक वक्ता, धुरंधर सेनापती आणि खंदा समाजसुधारक असे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे एक शतपैलू रत्न !!!

“मारता मारता मरेतो झुंजेन”
अशी लहान वयातच देवीपुढे गंभीर शपथ घेणारे शिवाजी महाराजांनंतरचे सावरकर हेच पहिले! अशा क्रांतिकारी महापुरुषाला आणि त्यांच्या विचारधारेला अधिक उमजून घेऊया श्री शरद पोंक्षे यांच्या ओघवत्या शैलीतून.

श्री शरद पोंक्षे यांना १९८८ पासून आजवर आपण अनेक प्रसिद्ध हिंदी तसेच मराठी चित्रपट,नाटके आणि मालिकांमध्ये पाहत आलो आहोत. “मी नथुराम गोडसे बोलतोय” या नाटकाचे एक हजारहून अधिक यशस्वी प्रयोग त्यांनी केले आहेत आणि त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘मी आणि नथुराम’ या पुस्तकाची केवळ ४ महिन्यांच्या विक्रमी वेळेत ६वी आवृत्तीही प्रसिद्ध होत आहे. स्वातंत्र्यवीर हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आणि या विषयावरील त्यांची अनेक ज्वलंत व्याख्याने जनसामान्यांना भावली आहेत. अशा या हरहुन्नरी व्याख्यात्याला लाईव्ह ऐकण्याची व त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची पर्वणी आपल्याला मिळते आहे.

*तसेच, “मनुष्याच्या सर्व शक्ती, ह्या त्याने स्वतःला ओळखण्यात आहे” अशी विचारधारा असणाऱ्या अखंड मूर्तिमंत स्वातंत्रवीर सावरकरांना पुन्हा नव्याने आत्मसात करण्यासाठी महाराष्ट्र मंडळ कतार समिती २०२१, २०२२ वरील व्याख्यानाच्या जोडीनेच आपणां सर्वांसाठी विविध उपक्रम राबवित आहे. *

◆ उपक्रम (सावरकरांच्या जीवनावर आधारित)

१) कविता/गीत सादरीकरण.
२) लेख वाचन.
३) एकपात्री अभिनय.
४) वेशभूषा सादरीकरण.
५) परिवारीक प्रश्नमंजुशा.

◆ सादरीकरणाची नियमावली पुढीलप्रमाणे :-

१) आपल्या सादरीकरणाची चित्रफित mp4 Format मध्ये असावी.
२) आपल्या सादरीकरणातील कविता/ लेख स्वरचितच असावेत असा आग्रह नाही.
३) चित्रफितीची वेळ मर्यादा दोन मिनिटांची असेल.
४) चित्रफितीमधील मजकूर वाद-जनक, आक्षेपार्ह आणि कतार- भारताच्या संस्कृतीला विरोधाभास करणारा नसावा.
५) चित्रफितीची गुणवत्ता चांगल्या दर्जाची असावी.
६) चित्रफीत mmqreg@gmail.com वर इमेल करावी. अंतिम तारीख : बुधवार, दि. २६ मे २०२१.
७) वरीलपैकी कोणत्याही सादरीकरणासाठी वयोमर्यादा नाही.
८) चित्रफित प्रसारित करण्याचे सर्व हक्क केवळ महाराष्ट्र मंडळ कतारकडे अबाधित राहतील.
९) फॅमिली क्विझ मध्ये नावनोंदणी करण्यासाठी mmqreg@gmail.com वर इमेल द्वारे नाव नोंदणी करावी. नावनोंदणीची अंतिम तारीख २५ मे असणार आहे.
१०) उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी मंडळाचे सभासद असणे अनिवार्य आहे.

मंडळी, नेहमीप्रमाणे यंदाही आपल्या उदंड प्रतिसादाने आपण सर्वार्थाने सावरकर जयंती साजरी करु यात शंका नाही.

आपलं मंडळ, आपली संस्कृती!
एक अतूट नातं, मराठी मनाशी !!

अधिक माहितीसाठी संपर्क:-
निलेश पार्सेकर : ७०१४९५०४
सुशांत सावर्डेकर : ३३८२३७३८
रचना चौधरी : ५०८२६९५३
विक्रम देशमुख : ३३२२१८१७

आपली कृपाभिलाषी,

कार्यकारिणी समिती, २०२१,२२
महाराष्ट्र मंडळ कतार
www.mmqatar.com