नमस्कार मंडळी, 🙏

आधी जाहीर केल्याप्रमाणे रंग पतंग २०२२ आणि पावनखिंड (मराठी चित्रपट) या दोन्ही कार्यक्रमांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

कार्यक्रम १)
”रंगपतंग-२०२२”
दिनांक : शुक्रवार १८/०३/२०२२,
वेळ: सकाळी १०. ०० ते ०६००.
स्थळ : Al Safliyah Island.

Register Now

हा कार्यक्रम सुरू होणार आहे पतंगबाजीने अन् दिवस भर चालणाऱ्या आपल्या या कार्यक्रमाची सांगता होणार आहे रंगांची उधळण व धमाल नाच गाण्यांनी.

या कार्यक्रमानिमित्त खाली दिलेल्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून, पारितोषिक वितरण त्याचं ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.

१. उत्कृष्ट पतंगबाज
२. पतंगबाज कुटुंब
३. उत्कृष्ट पतंग सजावट:
सजावट साहित्य स्पर्धकाने आणावयाचे असून आपल्या मनासारखी तुम्ही पतंगाची सजावट करुन आकर्षक बक्षीस मिळवू शकता.

नियम व अटी:
• सगळ्या स्पर्धांचे सर्व नियम व अटी महाराष्ट्र मंडळ कतार, कार्यकारिणी समिती २०२२ राखून ठेवत आहे.
• प्रत्येक वर्गातील केवळ एक एक विजेता निवडला जाईल.
• स्वतंत्र परीक्षक नेमून या स्पर्धेचे आकलन केले जाईल व परीक्षकांचा निर्णय अंतिम असून त्यांच्या निर्णयाला आव्हान देता येणार नाही. कार्यकारिणीचा परीक्षकांच्या निर्णयामध्ये कोणताच हस्तक्षेप नसेल.
•पतंगबाजीकरिता आवश्यक पतंग व मांजा यांची खरेदी मंडळाकडूनच कार्यक्रमस्थळी करणे अनिवार्य असेल.
•आपण खरेदी करू इच्छित असलेल्या पतंग व मांजाची आगाऊ खरेदी नोंदणी करणे आवश्यक असेल.
पतंग खरेदी नोंदणीसाठी लागणारी गुगल फॅार्मची लिंक देखील लवकरच पाठवण्यात येईल.

पतंग आणि मांजा दर खालील प्रमाणे.

लहान २ पतंग – QR. ६/-
मध्यम २ पतंग – QR. ८/-
मोठे २ पतंग – QR. १२/-
(मांजा / फिरकी) – QR.१५/-

नोंदणी करणाऱ्या सभासदांना राखीव केलेले पतंग/फिरक्या (मांजा) घेणे अनिवार्य राहील याची नोंद घ्यावी.

विशेष टीप: ह्या कार्यक्रम आणि स्पर्धा या मध्ये सभासद आणि असभासद या सर्वांना सहभाग घेता येईल.

कार्यक्रम २)
”पावनखिंड”
(मराठी ऐतिहासिक चित्रपट).

स्थळ: – एशियन टाऊन शुक्रवार दिनांक २५ मार्च २०२२
वेळ: – दुपारी ३.०० वाजता

या दिवशी आपण “सर्वोत्कृष्ट पारंपरिक पोशाख” या स्पर्धेचे आयोजन केले असून पारितोषिके खालील प्रमाणे असतील.

१) सर्वोत्कृष्ट पोशाख पुरुष
२) सर्वोत्कृष्ट पोशाख स्त्री
३) सर्वोत्कृष्ट पोशाख बालके (५ ते १२ वयवर्षे)

तिकीट बुकिंग साठी नियमावली खालील प्रमाणे
१) पाच वर्षे व त्या पुढील वयोगटातील सर्व मुलांना सिनेमागृहात प्रवेशासाठी स्वतंत्र तिकीट आरक्षित करणे गरजेचे असेल.
२) COVID नियमावलीस अनुसरून सिनेमा गृहाच्या प्रांगणात तसेच अंतर्भागात सतत मास्क घालणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे सर्वांना बंधनकारक असेल. आपल्या स्वसुरक्षितेच्या उद्देशाने सॅनिटायझरचा वापरही करावा.
३) वॅक्सीनेशनच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असणे आणि EHTERAZ green with golden frame असणे अनिवार्य आहे. याची तपासणी सिनेमागृहाच्या सुरक्षरक्षाकडून प्रवेश देण्यापूर्वी करण्यात येइल.
यामध्ये मंडळाचा कुठलाही हस्तक्षेप नसेल. मुलांना कतार COVID नियमावली प्रमाणे प्रवेश देण्यात येईल.
४) संकेतस्थळामार्फत तिकिटे नोंदणी करताना खर्ची केलेली रक्कम अथवा आरक्षित आसन क्रमांक यांचा गोंधळ झाल्यास, तसेच कतारच्या कोविड नियमांमध्ये बदलामुळे प्रयोग रद्द झाल्यास आपल्या तिकीटे विक्री किंमतीचा परतावा, हा Q-ticket च्या नियमानुसार केला जाईल याची कृपया नोंद घ्या.
त्यासाठी कृपया खाली नमूद केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
Q ticket customer care # 44069090
५) ५ वर्षांखालील मुलांना सिनेमागृहांमध्ये प्रवेश विनामूल्य असेल पण त्यांना आसन आरक्षित नसेल. सिनेगृहांमध्ये आपल्या पाल्याच्या आवाजामुळे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. सिनेमागृहाच्या आत कोणत्याही मुलांना खेळण्यास मज्जाव असेल याची खबरदारी पालकांनी घ्यावी. या कारणास्तव सुरक्षारक्षक अश्या पाल्यांना सिनेमागृहांमध्ये प्रवेश नाकारू शकतात. त्यास मंडळ जबाबदार राहणार नाही.
६) आपली वाहने उभी करताना कतार ट्रॅफिक नियमाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
वरील सर्व नियम हे कटाक्षाने पाळले जातील याची खबरदारी सर्वांनी घ्यावी व मंडळास सहकार्य करावे हि विनंती.

रंग पतंग २०२२ या अंतर्गत पुढील गोष्टीचा अंतर्भाव मंडळाकडून करण्यात येईल

१) होळी स्थळावर येण्या जाण्यासाठी बोटीची सोय
२) होळी स्थळावर होळीचे रंग आणि सॅनिटाझर
३) होळी स्थळावर पिण्याचे पाणी, चहा कॉफी, दुपारचे भोजन, सकाळची न्याहारी, संध्याकाळचे स्नॅक्स आणि शीतपेये
४) DJ व्यवस्था (आवाज क्षमता ही स्थळ आयोजकांच्या नियमानुसार ठेवण्यात येईल)
५) विविध खेळ आणि मनोरंजन व्यवस्था
६) Toilet व्यवस्था
७) बनाना ride
आणि अजून बरेच काही

मंडळाचे नवीन सभासदत्व अथवा नूतनीकरण हे वरील दोन्ही कार्यक्रमाच्या दिवशी त्याच ठिकाणी करता येईल.

सदस्यत्व शुल्क तपशील खालील प्रमाणे.

Family – Full Year renewal (QR १५०/-)
Bachelor – Full year renewal (QR ७५ /-)
Family – Full year new (QR २००/-)
Bachelor – Full year new (QR १२५/-)

”रंगपतंग २०२२, पावनखिंड” चित्रपट आणि पतंगांची नोंदणी स्थळे दिनांक १० मार्च २०२२ रोजी संध्याकाळी ०७.०० वाजता खुली करण्यात येईल. ही नोंदणी दिनांक १५ मार्च २०२२ रात्री १२ वाजेपर्यंत खुली राहील. दिनांक १५ मार्च २०२२ नंतर कुठलीही नोंदणी घेता येणार नाही.

अधिक माहितीसाठी व आपल्या मंडळाचे सभासदस्यत्व घेण्यासाठी खाली दिलेल्या समिती सभासदांना नमूद केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता.
१) श्री. संजय पाटील, अध्यक्ष # ३३१४६८३१
२) श्री. निलेश पार्सेकर, उपाध्यक्ष # ७०१४९५०४ (एझदान ६, अल वक्रा)
३) श्री. सुशांत सावर्डेकर, सचिव # ३३८२३७३८ (एझदान ३, अल वक्रा)
४) सौ. नम्रता तावडे, सह सचिव # ६६१६४३५७ (ऐन खालिद)
५) श्री. सागर माणगांवकर, खजिनदार # ६६९०१२३२ (एझदान २१, अल वक्रा)
६) श्री. मनीष शहा, समिती सदस्य # ५५४३६५३७ (अलमुफ्ताह व्हिलेज, अल वक्रा)
७) श्री. राकेश वाघ, समिती सदस्य # ३३२०१६१५ (अल जजिरा कंपौंड, न्यू सलाता)
८) सौ. रचना चौधरी, समिती सदस्य # ५०८२६९५३ (एझदान २४, अल वक्रा)
९) श्री सिद्धेश झाडे, समिती सदस्य # ६६०४९६९० (एझदान २४, अल वक्रा)
१०) श्री विक्रम देशमुख, समिती सदस्य # ३३२२१८१७ (एझदान ३१, अल वक्रा)
११) श्री अमोल भोंगाळे, समिती सदस्य # ५०२५११७९ (अल हिलाल, दिल्ली लौंन्ड्री च्या बाजूला)

With Warm Regards

Managing Committee 2021, 2022
Maharashtra Mandal Qatar,
Doha, Qatar.
E-mail:*
qatarmmq@gmail.com
Website:
www.mmqatar.com
Facebook Group: @MaharashtraMandalQatar
WhatsApp # 50203931.