MMQ Navratri 2020

नमस्कार मंडळी,

शारदोत्सवाचा शुभारंभ,
नवरंगांची होई उधळण !
भक्ती-स्फूर्तीने करू साजरा,
नवरात्रौत्सवाचा हा देखणा सण !

आज, अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अखिल भारतात सर्वत्र मनोभावे साजरा होणारा नवरात्रौत्सव सुरू होत आहे. या नवरात्रौत्सव आपणां सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

आपल्या महाराष्ट्रातही स्त्रिया घटामध्ये देवीची स्थापना करून, देवीसमोर अहोरात्र नंदादीप प्रज्वलित करून नऊ दिवस उपवास करून आदिमायेची मनोभावे पूजा करतात. पहिल्या दिवशी घटस्थापना होताच दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्र व्रत घरोघरी केले जाते.
या व्रत-वैकल्यांबरोबरच आपल्या परंपरेत भोंडला, नवरात्र उत्सवातील साड्यांचे रंग व गरबा अशा अनेकविध सामाजिक रूढी नवरात्र उत्सवाशी निगडित झाल्या असून जोपासल्या गेल्या आहेत. महाराष्ट्र मंडळ कतार आपल्या ऑनलाईन कट्टा या उपक्रमाअंतर्गत मंडळाच्या सर्व सभासदांना नवरात्रातातील हे अनोखे क्षण साजरे करण्याची संधी प्रदान करीत आहे.

महाराष्ट्र मंडळ कतार आयोजित
MMQ ऑनलाईन कट्टा – पुष्प ८ वे
‘MMQ नवरात्रोत्सव २०२०’

नवरात्रौत्सवातील खालील ऑनलाईन उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपण मंडळाच्या फेसबुक ग्रुपवर ( Facebook group link ) व/ अथवा इंस्टाग्रामवर ( Instagram link ) आपले छायाचित्र/ व्हिडीओ अपलोड करावेत.
( With a hashtag: #mmqnavaratri )

१)नवरंग चॅलेंज :

नवरात्र उत्सवातील साड्यांचे रंग ही एक नवी सामाजिक संकल्पना नवरात्र उत्सवाशी अलीकडील काही वर्षात जोडली गेली आहे. नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार देवीला त्या त्या दिवशी विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते. महाराष्ट्रातील अनेक शहरांतील स्त्रियाही अशाच प्रकारे नवरात्रातल्या दिवसांत त्या ठरावीक रंगाचा वेष परिधान करतात. आणि याच नवरंगांची मुक्त उधळण करण्याची अनोखी संधी आपल्याला मिळते आहे, महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे :
– या अनोख्या नवरंग चॅलेंजमध्ये मंडळातील सर्व स्त्रिया आपल्या कुटुंबियांसह अथवा वैयक्तिकरित्या सहभागी होऊ शकतात.
– प्रत्येक दिवसाच्या रंगाप्रमाणे आपण साडी अथवा भारतीय पोशाख परिधान करून आपले छायाचित्र मंडळाच्या फेसबुक ग्रुपवर आणि इंस्टाग्रामवर अपलोड करू शकता.
(With a hashtag : #mmqnavaratri)

२) भोंडला आरास व भोंडल्याची गाणी :दसरा विशेष

– आपल्या मराठी परंपरेतील भोंडल्याची विविध गाणी आपण ऑडिओ/ व्हिडीओ/ टेक्स्ट स्वरूपात दिवशी अपलोड करू शकता तसेच
आपल्या पारंपरिक भोंडल्याची आरास (चित्र/रांगोळी/ हस्तकला साहित्य या पैकी कोणत्याही माध्यमाचा वापर करून) ही आरास व खिरापतीच्या विविध प्रकारच्या पदार्थांच्या माहितीसह छायाचित्र/ व्हिडीओ दसऱ्याच्या दिवशी अपलोड करू शकता.
-भोंडल्याची आरास सादर करताना देवदेवतांच्या प्रतिमांचा अंतर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी.

३) गरबा/ दांडिया:

येत्या नवरात्रीत आपण गरबा / दांडियाच्या वेषातील आपले व कुटुंबियांचे छायाचित्र/ विडिओ अपलोड करू शकता.
– गरबा वेषातील छायाचित्र/ व्हिडिओ अपलोड करताना कतारच्या स्थानिक नियमांचा विचार करावा.

चला तर मंडळी, ऑनलाईन स्वरूपात भेटून साजरा करूया स्त्री शक्तीचा अनोखा जागर, ‘MMQ नवरात्रोत्सव २०२०’

आपलं मंडळ, आपली संस्कृती !
एक अतूट नातं, मराठी मनाशी !

अधिक माहितीसाठी संपर्क :

संजय पाटील : ३३१४६८३१
अतुल देसवंडीकर : ३३४८६७३४
श्वेता कोष्टी : ५५५९९७२४

With Warm Regards
Managing Committee 2019 & 20
Maharashtra Mandal Qatar.
E-mail: qatarmmq@gmail.com
Website: www.mmqatar.com
Facebook Group: @MaharashtraMandalQatar
Whatsapp # 50203931