आई
आई म्हणजे देवाचे रूप
आई म्हणजे प्रेमाचे स्वरूप
ज्याला लाभते तिची छाया
त्यालाच कळते तिची माया
तिचा तो डोक्यावरून फिरणारा प्रेमळ हाथ
जणू देवाची मिळालेली साथ
तिच्या रागावण्यात ही लपले असते प्रेम
सगळ्याच मुलांवर ती करते सारखं प्रेम
नऊ महिने गर्भात वाढवते ती आई
आयुष्यात आई लाभणे हीच आपली पुण्याई
तिच्या साठी नसतो आपल्याकडे उसंत
ती गेल्यावर मात्र वाटते तिची खंत
आई असतानाच तिच्यावर प्रेम करा
कारण ती आहे प्रेमाचा एक निर्मळ झरा
आई ही सर्वांची सारखीच असते
कोणाला असते तर कोणाला नसते
आईच्या ममतेचा आदर करा
वृद्धकाळी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करा
देव जिथे पोचू शकत नाही तिथे त्यांनी पाठवली आई
तिच्याविना आयुष्याचा काही अर्थच नाही
– प्राची प्रधान-रणदिवे