महाराष्ट्र मंडळ कतार, कार्यकारिणी समिती २०१९,२०२० ने आपल्या ‘MMQ ऑनलाईन कट्टा’ अंतर्गत सादर केलेल्या ‘शिवराज्याभिषेक दिन- अभिमान सोहळा’ या कार्यक्रमास आपण दिलेल्या उत्तुंग प्रतिसादाबद्धल आपले शतशः धन्यवाद!

सध्याच्या स्पर्धात्मक यंत्रयुगात जगण्यासाठी जीवघेणी धावपळ करत असताना आपले व आपल्या मुलांचे एका महत्वपूर्ण व विचारांना चालना देणाऱ्या सवयीकडे दुर्लक्ष होत चालले आहे आणि ती सवय म्हणजे वाचनाची.

आणि म्हणूनच महाराष्ट्र मंडळ कतार, कार्यकारिणी समिती २०१९,२०२० MMQ ऑनलाईन कट्टा अंतर्गत आपल्यासमोर अर्पण करीत आहे त्यांचे पुष्प ६ वे

“कैसी वाचिता अक्षरे” !!

◆ शुक्रवार, दि. १९ जून, २०२०
दुपारी ठीक १२ वाजता.
◆ MMQ FB पेजवर थेट LIVE !
◆ सादरकर्ते : श्री.अमृत देशमुख- The Booklet Guy

तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व त्यायोगे आपला देश एक समृद्ध राष्ट्र म्हणून उदयास यावा म्हणून झटणारा आपल्यातीलच असा हा एक तरुण. पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट असणाऱ्या श्री. अमृत देशमुख यांनी आपली लठ्ठ पगाराची नोकरी सोडून तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी स्वतःला गेली दहा वर्षे सातत्याने झोकून दिले.
आजमितीस जवळपास १५ लाख फॉलोअर्स त्यांच्या Free Mobile app “BOOKLET” चा लाभ घेत पुस्तके वाचत आहेत.
श्री. अमृत देशमुख यांची तीन वेळा TED talk speaker म्हणूनही निवड झाली आहे.
त्यांचे “The seven Habits of Highly Effective READERS” हे पुस्तक तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.
जेथे सर्वसामान्य व्यक्ती मिनिटाला १५० शब्द वाचते तेथे हा अवलिया मिनिटाला १२०० शब्द वाचतो.

चला तर मंडळी, अशा या आगळ्या-वेगळ्या व्यक्तीमत्वाला भेटूया त्यांच्या वाचनाच्या अमृतयात्रेत येत्या शुक्रवारी दु. ठीक १२ वाजता MMQ FB पेजवर थेट !!!

आपलं मंडळ, आपली संस्कृती !
एक अतूट नातं, मराठी मनाशी !!

अधिक माहितीसाठी संपर्क :
संजय पाटील : ३३१४६८३१
सुजित खानलोस्कर : ३३४८९६८९