मऱ्हाठी शिनेमा “झिम्मा”

नमस्कार मंडळी

नुतन वर्ष २०२२ च्या आपण सर्व मित्र परिवार व आप्तेष्टांना महाराष्ट्र  मंडळ कार्यकारिणी समिती २०२१-२०२२ तर्फे आरोग्यदायी व समृद्धमय शुभेच्छा!!!

“मऱ्हाठी शिनेमा आणलाय औन्दा…. यताय न्हवं बघायला!!!”

वर्ष २०२२ ची सुरुवात मंडळ अतिशय दमदार, धुमधडाक्यात आणि २२ हर्षोल्हासात करू इच्छिते आणि म्हणूनच खास आपल्यासाठी घेऊन येत आहोत, नवा कोरा सुपरहिट मराठी चित्रपट ….

“झिम्मा”
(झिम्मा म्हणजे …. “जल्लोष स्त्रीत्वाचा”)

सहकुटुंब पाहावा असा हा चित्रपट, याची प्रचिती आपणास ट्रेलर्स वरून येईलच. ट्रेलर पाहण्यासाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करावे.

https://www.youtube.com/watch?v=o8EZsgN167A
https://www.youtube.com/watch?v=hXwwjnURmdw

पहिला प्रयोग :
स्थळ: – एशियन टाऊन स्क्रीन ३
दिनांक १४ जानेवारी २०२२
वेळ: – सकाळी १० वाजता

दुसरा प्रयोग :
पाहिल्या प्रयोगाच्या प्रतिसादावर या प्रयोगाचे आयोजन आधारित असेल. सिनेमा आसन क्षमतेच्या किमान ७५% टक्के आसने आरक्षित होणार असल्यास दुसरा प्रयोग करण्यात येईल.
प्रतमतः प्रयोग क्र.१ ची तिकीटविक्री करण्यात येईल. प्रयोग क्र. १ ची तिकीट विक्री पूर्ण झाल्यानंतरच प्रयोग २ ची तिकीट विक्री करण्यात येईल. त्यामुळे प्रयोग २ ची मंडळ कुठलीही शाश्वती देत नाही.
दिनांक १४ जानेवारी २०२२
वेळ आणि स्क्रीन: – प्रयोग २ बुकिंगच्या वेळी कळविण्यात येईल.

दोन्हीं प्रयोगांची तिकीटविक्री ही दोन भागामध्ये करण्यात येईल.

पहिल्या प्रयोगाची तिकीटविक्री  रविवार दिनांक ०९ जानेवारी २०२२ ठीक सायंकाळी ०७३० वाजता

www.mmqatar.com

या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. त्यासाठीची लिंक मंगळवार, दि. ११ जानेवारी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत चालू राहील.

दुसऱ्या प्रयोगाची तिकीटविक्री ही पहिला प्रयोग हाऊसफुल झाल्यानंतरच चालू करण्यात येईल.

सर्व तिकिटे
www.mmqatar.com

या संकेतस्थळावरच उपलब्ध असतील.

कृपया खाली दिलेल्या नियम आणि अटी पूर्णतः तपासूनच तिकिटे आरक्षित करावीत ही नम्र विनंती.

१) Online तिकिटे खरेदी केल्यानंतर आपल्यालाआलेला मेसेज दाखवून आपण आपले तिकीट एशियन टाऊन सिनेमा येथे प्रयोगाच्या दिवशी १ तास आधी येऊन कार्यकारिणी समिती सदस्यांकडून घेऊ शकता. (हीच तिकीटे दाखवून आपणास सुरक्षारक्षकांकडून सिनेमागृहांमध्ये प्रवेश देण्यात देईल. त्यामुळे ही तिकिटे घेणे हे सर्वासाठी अनिवार्य असेल.)

२) ह्या चित्रपटाचे प्रयोग हे महाराष्ट्र मंडळ कतारच्या सभासदांसाठीच उपलब्ध असल्याने महाराष्ट्र मंडळाचे सभासदस्यत्व घेणे हे अनिवार्य असेल. सभासदस्यत्वाचे दर हे चित्रपट दराच्या व्यतिरिक्त आहेत. सभासदस्यत्वाचा दर तक्ता खालीलप्रमाणे. सभासदस्यत्व घेणे अनिवार्य असल्याने तुम्ही तुमचे सभासदस्यत्व खाली नमूद केलेल्या समिती सदस्यांशी संपर्क साधून सुपूर्द करू शकता अथवा प्रयोगाच्या दिवशी सकाळी ०८३० वाजता येऊन घेऊ शकता. आपण जर प्रयोगाच्या दिवशी उशिरा आलात आणि सर्व औपचारिकता पूर्ण करण्यास विलंब झाल्यास आपला सिनेमाचा वेळ बुडू नये यासाठी मंडळाने आपला वेळ वाचवण्यासाठी पूर्वव्यवस्था केली आहे. तेव्हा प्रयोगाच्या दिवशी सभासदस्यस्तव घेणे टाळून ते आधीच खाली नमूद केलेल्या आपल्या जवळील समिती सदस्यांकडे संपर्क साधून सुपूर्द करावे जेणेकरून प्रयोगाच्या दिवशी आपली घाई गडबड होणार नाही.

Categories: –

Family Full year new 200 QAR
Batchelor Full year new 125

Family Full Year renewal 150 QAR
Bachelor Full year renewal 75 QAR

Family Half Yearly new 125 QAR
Batchelor Half yearly new 100 QAR

Family Half Yearly renewal 75 QAR
Batchelor Half Yearly renewal 50 QAR

३) पाच वर्षे व त्या पुढील वयोगटातील सर्व मुलांना सिनेमागृहात प्रवेशासाठी स्वतंत्र तिकीट आरक्षित करणे गरजेचे असेल.

४) COVID १९ च्या नियमावलीस अनुसरून  सिनेमा गृहाच्या प्रांगणात तसेच अंतर्भागात सतत मास्क घालणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे सर्वांना बंधनकारक असेल. आपल्या स्वसुरक्षितेच्या उद्देशाने सॅनिटायझरचा वापरही करावा.

५) वॅक्सीनेशनच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असणे आणि EHTRAZ green with golden frame असणे अनिवार्य आहे. याची तपासणी सिनेमागृहाच्या सुरक्षरक्षाकडून प्रवेश देण्यापूर्वी करण्यात येइल.

६) तिकिटे बुक करताना काही payment चा अथवा तिकिटे नंबर चा गोंधळ झाल्यास, कतारच्या COVID नियम बदलामुळे प्रयोग रद्द झाल्यास अथवा काही बदल झाल्यास आपले तिकीट किंमत परतावा ही Q-ticket च्या नियमाप्रमाणे केले जाईल. त्यासाठी कृपया खाली नमूद केलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.
Q ticket customer care # 444069090

७) आपण सिनेमागृहामध्ये उशिरा पोहोचल्यास आणि त्यामुळे आपली सिनेमा तिकिटे व मंडळ सभासदस्यत्व घेण्याच्या औपचारिकतेला विलंब झाल्यास मंडळ त्यास जबाबदार असणार नाही.

८) ५ वर्षांखालील मुलांना सिनेमागृहांमध्ये प्रवेश विनामूल्य असेल पण त्यांना आसन आरक्षित नसेल. सिनेगृहांमध्ये आपल्या पाल्याच्या आवाजामुळे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.  सिनेमागृहाच्या आत कोणत्याही मुलांना खेळण्यास मज्जाव असेल. याची खबरदारी पालकांनी घ्यावी. या कारणास्तव सुरक्षारक्षक अश्या पाल्यांना आतमध्ये मज्जाव करू शकतात. त्यास मंडळ जबाबदार राहणार नाही.

९) आपली वाहने उभी करताना कतार ट्रॅफिक नियमाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

वरील सर्व नियम हे कटाक्षाने पाळले जातील याची खबरदारी सर्व मंडळ सभासद घेतील अशी खात्री आहे. वरील नियमांचे उल्लंघन झाल्यास आणि त्यामुळे आपला सिनेमा चुकल्यास त्यास मंडळ जबाबदार राहणार नाही.

अधिक माहितीसाठी व आपले सभासदस्यत्व घेण्यासाठी

खाली दिलेल्या समिती सभासदांना आपण नमूद केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता.

१)     श्री निलेश पार्सेकर, उपाध्यक्ष # ७०१४९५०४ (एझदान ६,अल वक्रा)
२)    श्री सुशांत सावर्डेकर, सचिव # ३३८२३७३८ (एझदान ३, अल वक्रा)
३)    श्री सागर माणगांवकर, खजिनदार # ६६९०१२३२ (एझदान २१, अल वक्रा)
४)    श्री मनीष शहा, समिती सदस्य # ५५४३६५३७ (अलमुफ्ताह व्हिलेज, अल वक्रा)
५)    श्री विक्रम देशमुख, समिती सदस्य # ३३२२१८१७ (एझदान ३१, अल वक्रा)
६)    श्री सिद्धेश झाडे, समिती सदस्य # ६६०४९६९० (एझदान २४, अल वक्रा)
७)   श्री अमोल भोंगाळे, समिती सदस्य # ५०२५११७९ (अल हिलाल, दिल्ली लौंन्ड्री च्या बाजूला)

With Warm Regards

Managing Committee 2021, 2022

Maharashtra Mandal Qatar,

Doha,Qatar.

E-mail : qatarmmq@gmail.com

Website: www.mmqatar.com 

Facebook Group: @MaharashtraMandalQatar

Whatsapp # 50203931