जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके विद्याधरी!
जोत्स्नेपरी कांती तुझी,
मुख रम्य शारदा!
चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुन,
चारी युगांची पौर्णिमा!
तुझिया कृपेचे चांदणे,
नित वर्षु दे अमुच्या शिरी !!
शुभ नवरात्री !
नवरात्री म्हणजे,
न – नवचेतना देणारी
व – विघ्नांचा नाश करणारी
रा – राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी
नमस्कार मंडळी! 🙏
२६ सप्टेंबर, म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदे पासून भारतात सर्वत्र नवरात्रौत्सव सुरू होत आहे. त्यासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
सुख शांती आणि समृद्धीच्या मंगल कामनांसोबत तुमच्या कुटुंबाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
मंडळी! आपला गरबा कार्यक्रमातील उत्साह आणि आवडीचे भान ठेवून, मंडळ यंदा जल्लोषात घेऊन येत आहे.
“MMQ‘s गरबा २०२२
दिनांक :- शुक्रवार, ३० सप्टेंबर २०२२
वेळ :- सायंकाळी ६ ते ११
(Gate will open at 5 pm) (प्रवेश मर्यादित)
स्थळ :- अल्फा स्कुल अल मेषाफ.
https://g.page/alpha-cambridge-school-qatar?share
तिकीटदर :-
MMQ members : –
Couple: QR 50. Individual: QR 35/Person
Non-member : – Couple: QR 65. Individual: QR 45/Person
Kids (Age group 9- 12)
MMQ members– QR 20. Non-members- QR 25
KIDS BELOW 8 YEARS WILL BE ADMITTED FREE OF COST.
HOWEVER, REGISTRATION FOR KIDS IS MANDATORY ON Q-TICKETS.
सदर लिंक बुधवार दि. १४ सप्टेंबर २०२२ सायंकाळ ठीक ७ वाजतां खुली करण्यात येईल. याची सभासदांनी कृपया नोंद घ्यावी. तिकीट विक्री १४ सप्टेंबर २०२२ ठीक ०७०० वाजता खुली करण्यात येईल. तिकीट विक्री लिंक ठराविक संखेपर्यंत आणि २५ संप्टेंबर २०२२ पर्यंत खुली ठेवण्यात येईल . त्यानंतर ती बंद करण्यात येईल. एका वेळी दोनच सभासद व्यक्तींचे बुकिंग होऊ शकेल. दोन पेक्षा जास्त, उदा: मुलांसाठी साठी पुन्हा वेगळे बुकिंग करावे लागेल.
मुख्य आकर्षण:
◆ विविध आकर्षक स्पर्धा (सर्व सभासदांसाठी):
१) उत्कृष्ट नृत्य- जोडी
२) उत्कृष्ट नृत्य- पुरुष
३) उत्कृष्ट नृत्य- स्त्री
४) उत्कृष्ट नृत्य- बच्चा पार्टी – मुलगा
५) उत्कृष्ट नृत्य- बच्चा पार्टी – मुलगी
६) उत्कृष्ट पोशाख – जोडी
उत्कृष्ट गरबा पोशाखात तयार होऊन येणाऱ्या निवडक (१-२) मुलामुलींना (वय वर्षे ५ खालील) मंडळातर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात येतील.

महत्वाच्या सूचना :-
1) कार्यक्रमादरम्यान कोविड प्रोटोकॅाल आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य आहे.
2) गरबा नृत्याच्या प्रांगणात कोणत्याही प्रकारचे खानपानाचे पदार्थ (अन्नपदार्थ/ पाणी/ शीतपेये इ.), पादत्राणे घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे, याची कृपया नोंद असावी.
3) कार्यक्रमस्थळी आपल्या लहान मुलांची, तसेच वैयक्तिक सामानाची जबाबदारी ही सर्वस्वी उपस्थितांची स्वतःची असेल.
4) गरबा स्पर्धेतील विजेत्यांच्या निवडीचे सर्व हक्क परिक्षकांचे असतील.
5) गरबा टिपऱ्याची सोय सभासदांनी स्वतःहा करावयाची आहे।
6) मंडळाच्या विद्यमान सभासदांव्यतिरिक्त ज्या असभासदांना (Bachelor/Family) मंडळाचे ३१ डिसेंबर २०२२ पर्यंतचे अर्धवर्षिक सदस्यत्व घ्यावयाचे असेल त्यांनी मंडळाचे सदस्य “श्री. मनिष शाह ५५४३६५३७” अथवा कार्यक्रमस्थळी नोंदणी कक्षाशी संपर्क साधावा.
८) सदर कार्यक्रम मंडळाच्या सभासद आणि असभासद साठी आहे याची सर्वानी नोंद घ्यावी.
MMQ स्टॉल–
MMQ स्टॉल अंतर्गत मंडळाच्या सभासदांना महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शवन घडविणारे चित्रण आणि MMQ सदस्यांद्वारे बनविलेल्या वस्तू विक्रीस ठेवण्याचे आयोजिलेले आहे.
विस्तारित संदर्भ खालीलप्रमाणे:
1) MMQ स्टॉल – 05 nos only. First, come first priority basis.
2) स्टॉलवर विकावयाचे विविध (हस्तकला) वस्तू प्रथम MMQ समितीसमोर दाखव्याव्या लागतील आणि त्यानंतर समिती सदस्यांच्या मान्यतेनंतर त्या MMQ स्टॉल वर विकण्यास परवानगी मिळेल.
3) साहित्य ठेवण्याची आणि विकण्याची जबाबदारी ही स्टॉल धारकाची असेल.
4) विक्री साहित्याच्या एकूण रकमेमधील 10% रक्कम ही MMQ कोशामध्ये जमा करण्यात येईल.
5) कार्यक्रमस्थळी साहित्य आणणे, स्टॉलमध्ये सुपूर्द करणे/उभारणे आणि दिवसअखेरीस उर्वरित वस्तू घेणे ही स्टॉल धारकाची जबाबदारी असेल.
6) सामग्री हाताळताना अनावधानाने झालेल्या कोणत्याही हानीसाठी MMQ समिती जबाबदार राहणार नाही.
7) वस्तू हस्तकला (सदस्यांनी बनवलेल्या) असतील किंवा इतर वस्तू महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शवत घडविणारे असणे अनिवार्य आहे.
9) कुठल्याही खाद्यपदार्थ वस्तूंच्या विक्रीच्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही.
10) मेंदी पेंटिंग, टॅटू, फेस पेंटिंग या प्रस्तावांवर विचार केला जाऊ शकतो आणि कार्यकारिणी सदस्यांच्या छाननीनंतरच त्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल. कलाकृती/पेंटिंग्स डिस्प्ले कम विक्री सारख्या प्रस्तावांचा विचार केला जाऊ शकतो आणि छाननीनंतरच अंतिम केला जाईल.
11) एक व्यक्ती अनेक वस्तू विक्रीसाठी ठेवू शकते.
12) कृपया सर्वानी नोंद घ्यावी की प्रथम ५ स्टॉल धारकाची नोंद करणाऱ्या नोंदकास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार MMQ व्यवस्थापकीय समितीकडे आहेत.
13) सर्व विक्री वस्तूची किंमत ही स्टॉल धारक आणि MMQ समिती सदस्यांबरोबर चर्चा करून अंतिम करण्यात येईल.
कृपया तुमच्या नोंदी mmqreg@gmail.com वर 20 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 12.00 पर्यंत पोहचतील याची नोंद घ्यावी. ई-मेल पाठवताना खालील नमूद केलेल्या माहिती पाठवणे आवश्यक आहे नाव
संपर्क क्र.
विक्री वस्तूची सर्व तपशील
विक्री किंमत
अधिक माहितीसाठी संपर्क :
निलेश पार्सेकर: ७०१४९५०४
सुशांत सावर्डेकर: ३३८२३७३८
मनिष शाह: ५५४३६५३७
रचना चौधरी : ५०८२७९५३
With Warm Regards,
Managing Committee 2021, 2022
Maharashtra Mandal Qatar,
Doha, Qatar.
E-mail: qatarmmq@gmail.com
Website: www.mmqatar.com
Facebook Group: @MaharashtraMandalQatar
Whatsapp # 50203931