बाहेर कर्फ्यू घरात नवरा, म्हणजे आता माझ्या स्वातंत्र्यावर गदा आली ना. II
आता नाही पाहिजे तेंव्हा लोळण, आणि पाहिजे तेंव्हा गप्पा, सतत अहोंच्याच दिमतीला हजर रहा ना ll
आता नाही वॉटसअप, आणि नाही इनस्टा, सतत अहोंचाच चेहरा पहा ना ll
आता कसला करतेस वॉक, आणि काय करतेस योगा, आता अहोंच्याच भोवती फिरत रहा ना ll
आता कधी करणार वाचन, आणि कशी जपणार चित्रकला, आता नवरोबांसाठी, फक्त किचनमधेच रहा ना ll
Work from Home च्या नावाखाली, “अहो” सतत घरात आणि मी असणार कामात, घराबाहेर जायचा तर विचारच नको ना, कारण बाहेर बसलाय ना “तो”
“कोरोना” ll