अंधारून आले हे विश्व सारे निराशेच्या छायेत
अस्तित्वाच्या लढाईला जिंकू आम्ही सारे नात्यांच्या मायेत
जरी आहे करोनाच्या विळख्यात सापडले हे जग सारे
तरी नाही पाठ दाखवणार वादळाला आम्ही लढू मरेपर्यंत सारे
स्वकीयांसोबत बंदित राहू सर्व काही समजून
करू दोन हात या दैत्याशी सुरक्षित अंतर उमजून
नाही दिसत असला तरी जवळ बसला आहे वैरी लपून
स्वच्छता अन विलगतेतूनच सुरक्षित ठेवू आपले आरोग्य जपून
नाही पडणार बाहेर विनाकारण हाच आहे संयम
बाहेर जरी गेलो तरी पाळणार आहे हे सारे नियम
या लढ्यातील सर्व योद्ध्यांना आम्ही सर्वजण मनोभावे पूजतच आहे
सन्मानार्थ त्यांच्या दोन्ही हातांनी टाळी अन थाळी वाजतच आहे
अवघे भूमंडळच झाले आहे आता बंदिवास
अंतीम विजय आमचाच हाच आहे आता ध्यास
असेल जरी आता तो आमच्या सर्वांवर भारी
शास्त्ररुपी लसच असेल आता आमचा कैवारी
काळरात्र ही जाणारच आहे उद्याची सुंदर पहाट उजाडण्यासाठी
आता मना तू खंबीर हो जगायचे राहिलेले जगण्यासाठी
…….नितीन वसंत