अशाच एका संध्याकाळी ,
अचानक अनेक गोष्टी आठवल्या
कितीतरी दिवसात पिल्लाला घास नाही भरवला,
कितीतरी दिवसात बायकोला गजरा नाही आणला
कितीतरी दिवसात चांगलं पुस्तक नाही वाचलं,
कितीतरी दिवसात छान नाटक नाही पाहिलं
पैसे खूप जमले पण मित्र दूर झाले,
नातेवाईकही परक्यासारखे वागू लागले
बँक बॅलन्सला नाक्यावरच्या गप्पांची सर नाही आली,
आईच्या हातच्या जेवणाची आता फक्त आठवण राहिली
खरच काही कळत नाही, अजून किती धावायचं,
चेहरा हसरा ठेवून मन मात्र मारायचं
आता नक्की ठरवलंय मनासारखं वागायचं,
सगळं सोडून देऊन स्वच्छंदी जगायचं
जुन्या गोष्टी जुनी नाती पुन्हा एकदा शोधायची,
संध्याकाळ सरल्यावर नव्या सुर्याची वाट पाहायची.
©️संतोष
Wah aprateem ! Khuup sundar kavita lihiliy Dada