किती रे खेळशील कोरोना, हा लपंडाव वाटे …….. !!
किती संथ वहात होती, जीवनरूपी ही सरिता वाटे,
कोठुनी आली ही, महाभयंकर लाट वाटे,
किती हाहाकार ! मांडिलांसी जीवनां वाटे,
किती ग्रासिलेस, तू दिन-अनाथा वाटे,
व्यर्थ ठरत गेले, सर्व उपाय वाटे,
जरी स्वजनांत अंतर केलेस, परी हृदयात नात्यांचाच ठेवा वाटे,
किती रे खेळशील कोरोना, हा लपंडाव वाटे …….. !!
सोडूनिया दे, गनिमी काव्याने हे लढणे वाटे,
जरी नाहीच परतलो, मम मायदेशी वाटे,
तरी, कोण श्रावण-बाळ बनेल, निज अंध आई-बाबांस वाटे,
कुणां, स्वनवजात शोनुल्याला, आजी-आजोबा संगे भेटवावेसे वाटे,
तर कुणी जिवंत राहण्या, लढतो आहे परी स्वजनांसाठीच वाटे,
संसार मांडिला मायदेशी नि, मम येथे चातकापरी वाटे,
किती रे खेळशील कोरोना, हा लपंडाव वाटे …….. !!
किती दयनीय शव-सडा, तो मांडिला सकळ विश्वा वाटे,
परी, कोंडिलेस निष्पाप जना, कारागृहरूपी गृहात वाटे,
किती स्वमुखावर आवरण बांधावे ? गुदमरल्या सारखे रे वाटे,
स्वच्छंद हवेत श्वास घेण्या, मनरूपी पाखरू घेई भरारी निरोगी गगनात वाटे,
जीवावर येई तुझा हा, नश्वररूपी तांडव-नृत्य वाटे,
शास्त्रज्ञ, वैद्य आणिक सरकारी जन पार थकले शोधून उपाय वाटे,
किती रे खेळशील कोरोना, हा लपंडाव वाटे …….. !!
प्राज्ञ-भ्रमणध्वनी, हा जीवनाचा आधार वाटे,
निभावतात नाती, ती या इंटरनेटमुळेच वाटे,
नात्यांच्या सुरक्षिततेची, मिळे पावती भ्रमणध्वनीमुळेच वाटे,
मुलांच्या शाळा ही भरल्या, जणू संगणकावरच वाटे,
मनोरंजन व स्पर्धा हि, चालल्या इंटरनेट वाटे,
निष्पाप बालपणां गुंतविलेस भ्रमणध्वनीच वाटे,
किती रे खेळशील कोरोना, हा लपंडाव वाटे …….. !!
जरी चुकलासी मार्ग, नी स्वचुकेच, पोहोचलासी पृथ्वी वाटे,
तरी, नाहीच विलंब जाहला, जा परतुनी आपुल्या वाटे,
कोरोना, नच विसरू तुज, आम्ही आमरण वाटे,
नको पाहूस अंत आता, जीवाही भीती वाटे,
मायदेशी परतण्याचा, ध्यास लागला जीवा वाटे,
दे संमती पिलांना, परतण्या आपुल्या घरट्या वाटे,
किती रे खेळशील कोरोना, हा लपंडाव वाटे…………..…!!
सोनिया निलेश पार्सेकर
Khup sundar lihlay