हे बी दिस निघून जाईल,
हे बी दिस निघून जाईल,
तू धीर तर धर बे लेका,
आपण बी खतम करू कोरोनाले,
तू साथ तर दे बे जरा,
मंदिर बंद मस्जिद बंद,
झाली सारी गिरीजा घरे बंद,
घेतला साऱ्या देवांनी अवतार,
तेच करतिल आता कोरोनाचा संहार,
कोणी झाले पोलीस दादा,
तर कोनी झाले वैद्यबुवा,
झोले कोनी सफाई कर्मचारी,
तर कोणी झाले लंगर आचारी,
हे बी दिस निघून जाईल,
तू धीर तर धर बे लेका,
आपण बी खतम करू कोरोनाले,
तू साथ तर दे बे जरा,
आता आपल्याले बी उचला लागेल भला मोठा विडा,
राहून घरी आपापल्या करू बुर्जुगाची सेवा,
बनवून थोडं अन्न जास्तीच करू मजुरांची मदत,
तेव्हा कुठे होइल सोशल डिस्टसिंगला मदत,
लय झाला आतापर्यंत विदेशी वस्तुंचा माज,
होऊ आता आत्मनिर्भर स्वदेशीची धरून कास,
लागु आता कामाला सोडून सारी आलाली,
तेव्हाच तर येईल भारत देशात लय मोठी खुशहाली,
हे बी दिस निघून जाईल,
तू धीर तर धर बे लेका,
आपण बी खतम करू कोरोनाले,
तू साथ तर दे बे जरा,
– विक्रम अरुणराव देशमुख,
कतर, मो. 33221817.