ठरविले दिनचर्या असे शीर्षक कवितेचे
ठरविले दिनचर्या असे शीर्षक कवितेचे,
पण मनी विचार आले फक्त corona आणि corona चे च !
कशी बदलली आपली दिनचर्या कोरोनाने,
दिनचर्या नव्हे च तर आचार – विचार, अंतर्बाह्य सर्वच बदलविलेलं या कोरोनाने !!
कोणात आलाय नकारात्मक बदल,
तर कोणी जाणूनबुजून घडवतोय सकारात्मक बदल ।
कधी वाटतीय हि दिनचर्या…..सुंदर , हवीहवीशी,
तर कधी वाटते बेढब, आणि…… नकोनकोशी।
कधी भुलवतोय पक्षांचा किलबिलाट,
तर कधी आठवतोय मैदानावरील मुलांचा गलबला,
आणि नकोस वाटतो रस्त्यांवरील शुकशुकाट !
शतष: धन्यवाद नेटफ्लिक्स , ऍमेझॉन, आणि झी फाईव्ह ला,
ज्यांनी घरी आणले हॉलिवूड आणि बॉलीवूड ला,
quarantine, lockdown, social distancing ह्यांनी घातला हाहाकार सर्वत्र,
परंतु zoom, duo, व्हाट्स अँप, hangout ह्यांनी बांधलय सर्वाना एकत्र !
जुळतात दूरदूरचे नातेबंध ,
आणि करून टाकतो प्रत्येक आठवड्याचा शनिवार मंत्रमुग्ध !!
प्रत्येक जण जातोय याला सामोरे धीराने,
आणि शोधतोय नवनवीन प्रबंध याला हारविण्याचे !!
मानव हि तर अनुभूत निर्मिती देवाची।
मानव हि तर अनुभूत निर्मिती देवाची।
हीच ती वेळ , हीच ती वेळ,
जेव्हा देवास हि करून द्यावी लागेल प्रचिती ह्याची,
जेव्हा देवास हि करून द्यावी लागेल प्रचिती ह्याची !!
——————-सौ अनुराधा निलेश रापते.