अगत्याचे निमंत्रण : MMQ ऑनलाईन कट्टा, पुष्प ७ वे
“बाप्पा मोरया रे”– आनंदोत्सव

पाहता पाहता सरला श्रावण,
रम्य चतुर्थीची पहाट झाली !
सज्ज होऊ उधळण्यास पुष्पे,
आली आली गणाधीशाची स्वारी आली !!

नमस्कार मंडळी!!

महाराष्ट्र मंडळ कतार, कार्यकारिणी समिती २०१९,२०२० आपल्यासाठी घेऊन येत आहे, महाराष्ट्रात सर्वत्र जल्लोषात साजरा होणारा आणि प्रत्येक मराठी मनाच्या सर्वात जवळचा असा आपल्या सर्वांचा लाडका आनंदोत्सव,

MMQ ऑनलाईन कट्टा – पुष्प ७ वे
“बाप्पा मोरया रे”– आनंदोत्सव
२२ ते ३० ऑगस्ट २०२०

एक कलापूर्ण उपक्रम, ज्यामध्ये मंडळाचे सदस्य ऑनलाईन/ व्हिडीओ स्वरूपात सादर करू शकतात नृत्य, गायन, वादन, स्तोत्रपठण, अभिनय आणि सहभाग घेऊ शकतात आपल्या लाडक्या ‘फॅमिली अंताक्षरी स्पर्धा ’ आणि ‘ फॅमिली हाउझीमध्ये ‘ सुद्धा!

COVID -19 च्या प्रादुर्भावामुळे यंदा चैत्रमासात आपले कलाविष्कार सादर करण्यापासून वंचित राहिलेल्या मंडळाच्या सर्व लहान-थोर हौशी कलाकारांसाठी तसेच महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सवातील धामधूम यंदा अनुभवता न येऊ शकणाऱ्या आपणां सर्वांसाठी खास हा उपक्रम राबविण्यात येत आहे,

परंतु या उपक्रमाद्वारे मंडळ कोणत्याही प्रकारच्या सामाजिक एकत्रिकरणाला ( Social Gatherings) कोणत्याही प्रकारे पाठिंबा देत नसून खाली नमूद केल्याप्रमाणे दिलेले सर्व उपक्रम हे केवळ कौटुंबिक सादरीकरणापूरतेच मर्यादित ठेवून त्याचे चित्रीकरण करून मंडळाला पाठवावे असे स्पष्ट संकेत महाराष्ट्र मंडळ कतार आपणांस देत आहे. MMQ SUPPORTS QATAR MINISTRY’S ALL SOCIAL DISTANCING REGULATIONS & APPEALS ITS MEMBERS TO ABIDE BY THEM IN ANY CIRCUMSTANCES.

कार्यक्रमाची नियमावली खालील प्रमाणे :-
१. प्रवेश विनामूल्य (फक्त MMQ सभासदांसाठी)

२. या कार्यक्रमामध्ये मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक सभासदाचे MMQ चे वर्ष – २०२० चे सभासदस्यत्व असणे अनिवार्य आहे. (सभासदस्यत्वाबद्दल अधिक माहितीसाठी संपर्क : सचिव, श्री. संजय पाटील : ३३१४६८३१)

३. – कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणीची संपूर्ण तपशीलवार माहिती नोंदणी लिंकसह मंडळाकडून दि १०. ऑगस्ट २०२० रोजी पाठविण्यात येईल,

  • नावनोंदणीची अंतिम तारीख दि. १५ ऑगस्ट २०२० असेल.
  • व्हिडीओ पाठविण्याची अंतिम तारीख दि. २० ऑगस्ट २०२० असेल.

या तारखेनंतर आलेली कोणतीही नोंदणी स्विकारण्यात येणार नाही.

४. पुढील तक्त्यात दिल्याप्रमाणे, कार्यक्रमातील काही उपक्रम लाईव्ह तर इतर प्रि-रेकॉर्डेड विडिओच्या स्वरूपात मागविले जातील.

५. हा कार्यक्रम दिनांक २२ ते ३० ऑगस्ट २०२० दरम्यान महाराष्ट्र मंडळ फेसबुक पेजवर, व्हॉट्सअप ब्रॉडकास्ट तसेच संकेतस्थळावर प्रक्षेपित करण्यात येईल. त्या संबंधीची माहिती वेळोवेळी दिली जाईल.

उपक्रम सूची सोबत जोडत आहोत.

बाप्पा मोरया रे” उपक्रमामध्ये समाविष्ट असणाऱ्या कलाप्रकारांची यादी वरील तक्त्यात नमूद करण्यात आली आहे. सर्व इच्छुक सभासदांनी नावनोंदणीपूर्वी नमूद केलेल्या सर्व नियम व अटी वाचूनच आपल्या सहभागाची नोंदणी करावी. अपूर्ण माहितीसहित पाठविलेली नावे नोंदणीग्राह्य धरली जाणार नाहीत याची सर्व सभासदांनी नोंद घ्यावी.

नियम व अटी:

१. स्तोत्रपठण : या उपक्रमात नोंदणी केलेल्या सभासदाने गणपती स्तोत्र/अथर्वशीर्ष (आपल्या वयोगटाप्रमाणे) पाठ करून एकसंगतीने म्हणावे ही अपेक्षा आहे. वयोगट १५ पर्यंतच्या मुला- मुलींची स्तोत्रपठण स्पर्धा दि. २२ ऑगस्ट २०२० रोजी झूम अप्लिकेशनवर लाईव्ह घेण्यात येईल याची नोंद असावी. झूम मिटिंग व स्पर्धेच्या नियमाची तपशीलवार माहिती नोंदणीकृत सभासदांना देण्यात येईल. वयवर्षे १६ पुढील सभासदांनी अथर्वशीर्षाच्या पठणाचा एकसंध व्हिडीओ मंडळाला पाठविणे आवश्यक असेल.

२. गायन/ वादन : गायन सादरकर्त्यांनी गायनामध्ये फक्त मराठी/हिंदी गाण्यांचा समावेश करावा. गायन कराओके (Karaoke) स्वरूपात असावे. वादन सादरीकरणात कोणतेही संगीतवाद्य वाजवून त्याचा विडिओ पाठवावा. दिलेली वेळमर्यादा पाळणे अनिवार्य असेल.

३. नृत्य : (Solo/ Duet/Family/Multiple family video compilation) सादरकर्त्यांनी कोणत्याही मराठी/हिंदी गाण्यांचा समावेश करावा. दिलेली वेळमर्यादा पाळणे अनिवार्य असेल. Multiple Family Video Compilation या श्रेणीत सहभाग घेताना सहभागी कुटुंबांनी सामाजिक विलगिकरण (Social Distancing) पाळून हा विडिओ तयार करावा. अधिक माहितीसाठी मंडळाच्या समिती सदस्या श्वेता कोष्टी (५५५९९७२४) यांच्याशी संपर्क साधावा.

४. डायलॉग डिलिव्हरी : कुटुंबातील एका अथवा एकापेक्षा जास्त नोंदणीकृत सादरकर्त्यानी फक्त मराठी चित्रपटातील आपल्या आवडीचा कोणताही एक संवाद (डायलॉग) आपल्या आवाजात रेकॉर्ड करून अथवा mimimg / Lip sync स्वरूपात विडिओ करून share करावा. दिलेली वेळमर्यादा पाळणे अनिवार्य असेल.

५. फॅमिली अंताक्षरी स्पर्धा : हा उपक्रम ऑनलाईन लाईव्ह स्वरूपात शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी राबविण्यात येईल. उपक्रमाचे स्वरूप, नियम व अटी नोंदणीकृत सभासदांना कळविण्यात येतील. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे जाहीर केली जातील.

६. फॅमिली हाऊझी स्पर्धा : हा उपक्रम ऑनलाईन लाईव्ह स्वरूपात शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी राबविण्यात येईल. उपक्रमाचे स्वरूप, नियम व अटी नोंदणीकृत सभासदांना कळविण्यात येतील. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे जाहीर केली जातील.

७. प्रत्येक श्रेणीतील सादरीकरणाची वेळ ही नमूद केलेल्या वेळ मर्यादेपेक्षा जास्त नसावी. सादरीकरणाची वेळ जास्त असल्यास, सादरीकरण रद्द करण्याचे अधिकार मंडळाकडे असतील.

८. कार्यक्रमात सादर होणारी सर्व सादरीकरणे ही सुसभ्य, स्थानिक परंपरा लक्षात ठेऊन सादर करावीत, तसेच स्थानिक Customs व Protocol याच्या बाहेरील नसावीत याची सर्व सहभागी होणाऱ्या सभासदांनी नोंद घ्यावी.

९. प्रवेशिका स्विकारण्याचे अंतिम अधिकार कार्यकारिणी समितीचे असतील तसेच, योग्य कारणास्तव कोणतीही नोंदणी रद्द करण्याचे सर्व हक्क मंडळाकडे असतील.

चला तर मंडळी, यंदा कतारमध्येच अनुभवूया गणेशोत्सवाचा अनोखा जल्लोष – ‘MMQ बाप्पा मोरया रे’ उपक्रमात सहभागी होऊन !!!

अधिक माहितीसाठी संपर्क:
श्वेता कोष्टी : ५५५९९७२४
सुजित खनलोसकर : ३३४८९६८९
सागर मांणगावकर : ६६८६३६६३

Managing Committee 2019 & 20.
Maharashtra Mandal Qatar,
Doha, Qatar

E-mail: qatarmmq@gmail.com
Website: www.mmqatar.com
Facebook Group: @MaharashtraMandalQatar
Whatsapp # 50203931

उपक्रम तक्ता