साधारणतः जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही भारतात (पुणे येथे )आलो असताना पहिल्यांदा करोना विषाणू बद्दल ठळक पणे ऐकिवात आले. चीन मध्ये वूहान शहरामध्ये ह्याचा उद्रेक झाला असुन त्यामुळे अनेक जणांचे मृत्यू होत आहेत आणि हा विषाणू फुफुसांवर हल्ला करतो. असा हा विषाणू चा संसर्ग वटवाघूळ खाल्ल्याने झाला आहे असे कळले. अजून एक सिद्धांत अथवा वदंता अशी कि चीन काहीतरी रासायनिक प्रयोग करत असताना हा विषाणू चुकून मानवी शरीरात शिरला आहे आणि ती गोष्ट लपविण्यासाठी हे वटवाघूळ वैगरे वैगैरे गोष्टी मुद्दाम मध्यमसमोर आणल्या आहे.
दोह्या ला परततांना मुंबई विमानतळावर खूप जण मास्क लावून फिरताना दिसले ,तसेच दृश्य परत दोह्याच्या पण विमानतळावर अनुभूवले.हळू हळू करोना ने हात पाय पसरवायला सुरुवात केली, इटली आणि इराण हे दोन देशामध्ये त्याचा विळखा वाढला आणि मृत्यू दर वाढला. ह्या दोन देशांनी ग्रासलेल्या विळख्याने संपूर्ण जगाला जागे केले आणि धडाधड गोष्टी घडायला लागल्या. मूलतःच संसर्ग हा विमानातून प्रवास केलेल्यालोकांमुळे पसरत आहे हे लक्षात आले आणि जगभरातील विमान वाहतूक थांबवण्यात आली.
कतार हा देश इराणच्या अगदी जवळ आहे , समुद्र ओलांडल्यावर इराण इतपत जवळ , इथे पाहील्यान्दा इराणवरून येणाऱ्या विमानावर बंदी घातली आणि हळू हळू सर्वच प्रवासी विमान वाहतुकीवर बंदी आली. येथील सरकराने भारतासारखे सरसकट lockdown न करता partial lockdown केले. म्हणजे शाळा, विद्यापीठ, मॉल्स, सार्वजनिक समारंभ, बगीचे असे सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद केली. उपहारगृहे पूर्ण बंद न करता फक्त dine inn बंद केले. delivery take away सुरु ठेवले.
मी कतार मध्ये Parsons International नावाच्या अमेरिकन consultant कंपनी मध्ये इंजिनिर आहे आणि आमची कंपनी इथल्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट (ASHGHAL अरेबिक मध्ये असे म्हणतात ) ला सेवा पुरवते. इथे २०२२ मध्ये FIFA फुटबॉल चा वर्ल्ड कप होणार आहे त्यामुळे infrastructure ची कामे खूप जोरात सुरु आहेत. हि सगळी नॅशनल प्रोजेक्ट्स emergency सेवेमध्ये समविष्ट केली आहेत त्यामुळे आम्ही अजून सुद्धा काम करत आहोत. फक्त सगळ्या खबरदारी घेऊन काम करत आहोत. मास्क लावून, social डिस्टंसिन्ग चे पालन करून सगळे काम सुरु आहे. आमच्या प्रोजेक्ट मधील एका लेबनॉन च्या इंजिनिरची बायको शिया मुस्लिम असून ती नुकतीच एका महिन्यापूर्वी इराण वरून परतली होती, ह्या गृहस्थाला पण खोकला येत होता , त्याला ताबडतोप isolate केले आणि Medical treatment घेतली, त्याची swab test negative आल्यावर आमचा जीव भांड्यात पडला. तसेच एक भारतीय ड्राफ्ट्समन ह्याचा roommate Covid 19 positive निघाला त्यामुळे आम्हा ७ ते ८ जणांना ३ दिवस quarantine केले होते. साधारणतः ३ दिवसामध्ये symptoms develop होतात, असो आम्ही नशीबवान म्हणून कि ह्याची पण swab test negative आली. पण एक अजून केरळमधील इंजिनिर मात्र positive निघाला. मात्र पठ्ठया तयारीचा निघाला , स्वतः न घाबरतः त्याने pro-actively swab test केली, आणि ती positive निघाल्यावर सुद्धा न घाबरता त्याने स्वतःला quarantine केले , व इथल्या सरकारी नियमाचे पूर्ण पालन करत मेडिकेशन घेतले आज तो परत बरा झाला आहे आणि लवकरच तो परत कामावर रुजू होईल. ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला घडत असताना सुद्धा आम्ही सर्व जण काम करत आहोत, कधी कधी ह्याची भीती वाटते पण मग विचार करतो कि जे frontline Covid योद्धे आहेत जसे कि Doctors, Nurses, अथवा ward boys तसेच पोलीस आणि इतर सरकारी कर्मचारी ते पण तर आपल्यासारखेच धोका पत्करून काम करत आहेत आणि एक प्रकारे समाजाचे मनोबल वाढवत आहेत आपण सुद्धा एक Covid योद्धा आहे असे मानायचे आणि येईल त्या परिथितिला टक्कर द्यायची. ह्या पुढे जाऊन मी असे म्हणेल कि प्रत्येकानेच आता Covid योद्धा होण्याची तयारी करावी म्हणजे आपोआपच ह्याची भीती कमी होईल आणि आपली सर्वांची प्रतिकारशक्ती वाढेल.
इथे बऱ्याच देशाचे नागरिक काम करत आहेत माझे सहकारी भारत,पाकिस्तान, श्रीलंका , फिलिपिन्स, आयर्लंड, लेबनॉन,सीरिया, तुर्कस्थान, USA , कॅनडा , इजिप्त अश्या बऱ्याच देशांमधले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे , एक मात्र समाधान लाभले जेव्हा भारताने economy कडे न बघता भारतीय नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी लवकर कडक उपाय योजिले आणि त्यामुळे भारताला मृत्यू दर कमी ठेवण्यात यश मिळाले ह्यावरून चर्चा होत असताना भारतीय नेतृत्वाबद्दल अगदी अनपेक्षित लोकांनी सुद्धा कौतकाच वर्षाव केला ह्याचा फायदा नक्कीच lockdown संपल्यावर भारताला आणि भारतीय अर्थव्यवस्थेला होईल हे नक्की.
माझी मुलगी येतील बिर्ला पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता ७ वी मध्ये शिकत आहे , शाळेने e school सुरु केले , सगळं अभ्यास आणि तास हे आता online होत आहेत दररोज ती सकाळी ८ वाजे पासून ते दुपारी २ वाजे पर्यन्त हे सगळे कॉम्पुटर समोर बसून.
मला वाटत कि हा करोना हा दुधारी तलवार आहे, lockdown केले तर economy मरते, पण माणूस जगतो. पण हेच lockdown दीघर्काल चालले तर उपासमारीने मारण्याची वेळ येईल अथवा अनेक गरीब कुटुम्बान्वर आली आहे . म्हणजेच प्रत्येक देश असा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न्न करत आहे कि इकॉनॉमी पण चालेले आणि कमीत कमी संसर्ग होईल व मृत्यू दर कमी होतील. अर्थात हे सगळे निर्णय देशाची भौगोलिक, सामाजिक, आर्थिक स्थिती तसेच राज्यकर्त्यांची मानसिकता ह्यावर अवलूंबून असते. जेव्हा केव्हा हि महामारी कमी होईल आणि त्याचे पृथकरण करण्यात येईल तेव्हा मृत्यू पावलेल्या लोकांचे वय , असेलेले आजार , अजून काही इतर कॉम्प्लिकेशन्स ह्या सगळ्यवार WHO समिती नेमून विचार करेल आणि नक्कीच काहीतरी मार्गदर्शक पाऊल पुढे टाकेल अशी अशा करूयात.
मी इथे कतार च्या महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणी समितीमध्ये खजिनदार म्हणून काम पाहत आहे आणि त्या मुळेच मला आणि आम्हा सर्व कार्यकारिणी समितीच्या सदस्यांना #VandebharatMission मध्ये खारीचा वाटाउचलण्याची संधी मिळाली. भारतीय सरकारने आणि भारतीय वकिलातीने इथून अडककलेल्या भारतीयांना परत मायदेशी नेण्यासाठी एक खूप मोठी मोहीम चालू केली आहे हे आपण सर्व जाणून असालच त्या मध्ये अडकलेल्या भारतीयांना त्या त्या राज्यामध्ये पाठवण्यासाठी भारतीय वकिलातीने एक अर्ज online सुरु केला आहे , इच्छुकाने त्यावर जाऊन आपली माहिती भरली आहे. ती सर्व माहितीची छाननी करून प्रत्येक राज्य निहाय याद्या करण्याचे मोठे काम Indian Embassy आणि Indian Cultural कौन्सिल मार्फत सुरु आहे. आणि आम्ही राज्यनिहाय associated organizations पदाधिकारी आणि खूपसारे volunteer’s च्या मदतीने सर्वां पर्यंत पोहोचायचे काम सुरु आहे.
अनेक जणांच्या अनेक समस्या आहेत, काही गरोदर माता आहेत तर खूप जणांचं काम संपला आहे आणि घरी परत जाण्याची गरज आहे आणि विमान वाहतूक बंद असल्यामुळे गेले २ महिने अडकून पडले आहेत. अश्या अगतिक परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही फोन करतो तेव्हा खूप जणांना त्या फोनचा आधार वाटत आहे आणि भारत सरकार आपल्यापर्यंत पोहोचत आहे ह्याची जाणीव होत आहे त्याच वेळेस आम्हा सर्वाना सुद्धा एक कर्तव्यपूर्तीची भावना आणि आपला आवाज कोणा अनोळखी इसमास आधार देत आहे हे समाधान लाभात आहे. हि अगतिकता आता अनिश्चिततेचे स्वरूप घेत आहे
ह्या अनिश्चिततेच्या भयाने संपूर्ण मानव जातीला संकटात टाकले आहे. मानवाने निसर्गावर ताबा मिळवायचा कितीही प्रयत्न केला तरी निसर्गाने हे दाखवून दिले कि आपण किती खुजे आहोत आणि पृथ्वी वर आपल्यासोबत असलेल्या प्राणी मात्रांना सुद्धा जगण्याचा तेवढाच हक्क आहे नव्हे तर ती गरज आहे अन्यथा ecological cycle पूर्ण पणे धोक्यात येईल. पण मला हि खात्री आहे कि आपण सर्व ह्या संकटावर मात करू आणि लवकरच सर्व जगरहाटी सुरळीत होईल.
एक नक्कीच जेव्हा केव्हा हे संकट कमी होईल नक्कीच माणसाचा जगण्यासाठी असलेला प्राधान्यक्रम बदलेल व भांडवलशाही अर्थव्यवस्था कितपत योग्य आहे आणि वसुधैव कुटुम्बकम ह्या मूलतःच असेलल्या तत्वाला समाजमान्यता मिळेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
धन्यवाद
आपला विश्वासु
अतुल अरविंद देसवंडीकर,
दोहा, कतार
Sundar