ही लढ़ाई लढ़ तु
ही लढ़ाई लढ़ तु
ना इथे मित्र, ना शत्रु
ना इथे धर्म , ना जाती
स्वतः स्वतःशीच झुंज तु
ही लढ़ाई लढ़ तु
जीवनाच्या हया स्पर्धेत
नेहमीच धावलास तु
घे विश्रांती, जानुन घे अंतरंग
कापल आहेस बरच अंतर तु
ही लढ़ाई लढ़ तु
हो विलग, घे श्वास स्वतःचा
निरर्थक हे जग, मग अहंकार कश्याचा
मानुसकिच फक़्त नात जप तु
ही लढ़ाई लढ़ तु
…भुषण रणसिंग