मायमाऊली
बाळ ठोठावतं आतून
आईच्या कुशीत येण्याकरिता
दुध-बिध पाजून
न्हाऊ-माखु घालून
काजळ-तीट लावून
खाऊ-पिऊ घालून
गोंडस-गुटगुटीत बनवून
सुसज्ज बनविते त्याला
दुनियेची ओळख करण्याकरिता..(१)
खडतर प्रसंग येऊनही
त्याच्या बरोबर ठाम उभी राहते
आनंदाचे-दु:खाचे
हसण्याचे-रडण्याचे
कधी हळुवार मनाने
कधी वज्र बनून
प्रत्येक स्थिती सांभाळते
कणखर बनवून त्याला
स्वतःच्या पायावर उभं करते..(२)
नसते कोणती अपेक्षा
नसतो कोणता स्वार्थ
झेपेल असे शिक्षण
योग्य असे संस्कार
परोपकार-मानवतेची
शिकवण
संवेदनशील मनाचे
बनवते कुंपण
त्याच्या खुशी-प्रगतीत
मिळविते अपार समाधान..(३)
‘आई’ या शब्दात सामवलंय
अख्खं विश्व
कदर तिची कळायला
पुरेल का हा जन्म..(४)
-डॉ. शालिनी चिंचोरे