। ।श्री। ।
आई
आई एक
नाव असतं
घरातल्या घरात
गजबजलेलं गाव असतं!
आई असतो
एक धागा
वातीला उजेड दावणारी
समईतली जागा..!
आई खरंच काय असते?
लेकराची माय असते,
वासराची गाय असते,
दुधाची साय असते,
लंगड्याचा पाय असते,
धरणीची ठाय असते..!
आई असते
जन्माची शिदोरी
सरतही नाही,
उरतही नाही
‘बाईपणं – आईपणं’
आहे जन्माचं ग लेणं..
‘माया’ सरता सरेना
किती भूमिका करून ..!
अशी बहिणी ची माया
त्याला जगी तोड नाही..
छोटी मुक्ताई भगिनी
झाली ज्ञानेशाची आई..!
असे ‘दिर – भावजय’
तिन्हीं लोकी पूजनीय..
‘सीतामाता – लक्ष्मण’
नाही ऐसे उदाहरण..!
सृष्टी घालते जन्माला,
करी मायेची पाखर..
वेळ आल्यावरी होते
‘माता- पित्या’ चीही माय..!
तिच्या पदरा समोर
होई आभाळ ही थिटे..
सारे सामावून घेई
ऐसा सागर मनात..!
जेव्हा पंखातून फिरे
मऊ सायीचा तो हात..
येई पंखा मधे बळ
पिल्ले गाठती आकाश..!
अशी माय आहे बाप्पा
उभ्या जल्माची शिदोरी..
कधी सरणार नाही..
तरी उरणार नाही ..!
तरी उरणार नाही..!!
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!💝🙏💕