तेज तमअंस पर
कन्ह जिमि कंस पर
त्यों म्लेंच्छ बंस पर…
 
शेर शिवराज है
शेर शिवराज है
 
नमस्कार मंडळी, 🙏
 
नव्या, तसेच विविध कार्यक्रमांची रेलचेल चालू असतांनाच, मंडळी, अजून एक कार्यक्रम घेऊन येत आहोत…..
 
आपल्या जाणत्यां राजाची म्हणजेच छत्रपती शिवरायांची इतिहास ओळख करून देण्यासाठी आपणां सर्वांसाठी कार्यकारिणी २०२१, २०२२ खास घेऊन येत आहोत मराठी ऐतिहासिक चित्रपट…
 

”शेर शिवराज” – स्वारी अफझल खान-

 
 
(विशेष नोंद: – या चित्रपटाला कतार सेन्सॉर चे संमतीप्रमाणपत्र मिळाले आहे)
 

स्थळ: – एशियन टाऊन सिनेमा स्क्रीन ३,

दिनांक: – शुक्रवार, दिनांक २७ मे २०२२

वेळ: – दुपारी ३.०० वाजता

 
जी पिढी आपल्या स्वतःच्या पूर्वजांचा इतिहास विसरून जाते, परिस्थिती त्या पिढीचा भूगोल बदलून टाकते. आपल्या येणाऱ्या पिढीला स्वराज्याचं थोरलं धनी, हिँदवी राज्य संस्थापक छत्रपती श्री. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची वीरगाथा समजावी आणि इतिहासाची जोपासना व्हावी या साठी हा प्रयत्न.
 
तर मग सहकुटुंब आपण या जाज्वल्य आणि थरारक इतिहासाची साक्ष घेवूयात.
 
”शेरशिवराज- स्वारी अफझलखान-“
 
चित्रपटाची तिकिटे नोंदणी mmqatar.com या संकेत स्थळावरून शुक्रवार, दिनांक २० मार्च २०२२ रोजी दुपारी ०१०० वाजता खुली करण्यात येईल. ही नोंदणी दिनांक बुधवार, दिनांक २५ मे २०२२ रात्री १२ वाजेपर्यंत खुली राहील. ही सर्व नोंदणी mmqatar. com ह्या संकेतस्थळावरून करण्यात येणार असल्यामुळे दिनांक २५ मे २०२२ नंतर कुठलीही नोंदणी घेता येणार नाही.
 
तिकीट बुकिंगसाठी नियमावली खालील प्रमाणे
 
१) पाच वर्षे व त्या पुढील वयोगटातील सर्व मुलांना सिनेमागृहात प्रवेशासाठी स्वतंत्र तिकीट आरक्षित करणे गरजेचे असेल.
 
२) COVID नियमावलीस अनुसरून  सिनेमा गृहाच्या प्रांगणात तसेच अंतर्भागात सतत मास्क घालणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे सर्वांना बंधनकारक असेल. आपल्या स्वसुरक्षितेच्या उद्देशाने सॅनिटायझरचा वापरही करावा.
 
३) वॅक्सीनेशनच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असणे आणि  EHTERAZ green with golden frame अनिवार्य आहे. याची तपासणी सिनेमागृहाच्या सुरक्षरक्षाकडून प्रवेश देण्यापूर्वी करण्यात येइल. यामध्ये मंडळाचा कुठलाही हस्तक्षेप नसेल. मुलांना कतार COVID नियमावली प्रमाणे प्रवेश देण्यात येईल. १२ वर्षे वयोगटा पुढील मुलांना देखील आपले दोन्ही मात्रा घेतलेल्याचे vaacination सर्टिफिकेट दाखवणे बंधनकारक आहे. आपले vaacination झालेले नसल्यास आपले एक दिवस आधी केलेले antigen test सर्टिफिकेट बरोबर ठेवणे आणि ते सुरक्षरक्षकास दाखवणे बंधनकारक आहे.
 
४) संकेतस्थळामार्फत तिकिटे नोंदणी करताना खर्ची केलेली रक्कम अथवा आरक्षित आसन क्रमांक यांचा गोंधळ झाल्यास, तसेच कतारच्या कोविड नियमांमध्ये बदलामुळे प्रयोग रद्द झाल्यास आपल्या तिकीटे विक्री किंमतीचा परतावा, हा Q-ticket च्या नियमानुसार केला जाईल याची कृपया नोंद घ्या. त्यासाठी कृपया खाली नमूद केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
Q ticket customer care # 44069090
 
५) ५ वर्षांखालील मुलांना सिनेमागृहांमध्ये प्रवेश विनामूल्य असेल पण त्यांना आसन आरक्षित नसेल. सिनेगृहांमध्ये आपल्या पाल्याच्या आवाजामुळे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.  सिनेमागृहाच्या आत कोणत्याही मुलांना खेळण्यास मज्जाव असेल याची खबरदारी पालकांनी घ्यावी. या कारणास्तव सुरक्षारक्षक अश्या पाल्यांना सिनेमागृहांमध्ये प्रवेश नाकारू शकतात. त्यास मंडळ जबाबदार राहणार नाही.
 
६) आपली वाहने बाहेर उभी करताना कतार ट्रॅफिक नियमाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
 
७) चित्रपटाची तिकिटे दर पुढीलप्रमाणे: –
 
Prime seats
सभासद
Adults (वयवर्षं १२ आणि त्यापुढील) आणि Kids (वयवर्षं ०५ ते १२)- QR ४५
Kids- वयवर्षं ०५ खालील- विनामूल्य
 
असभासद
Adults (वयवर्षं १२ आणि त्यापुढील) आणि Kids (वयवर्षं ०५ ते १२)- QR ५५
Kids- वयवर्षं ०५ खालील- विनामूल्य
 
Normal seats
सभासद
Adults (वयवर्षं १२ आणि त्यापुढील) आणि Kids (वयवर्षं ०५ ते १२)- QR ४०
Kids- वयवर्षं ०५ खालील- विनामूल्य
 
असभासद
Adults (वयवर्षं १२ आणि त्यापुढील) आणि Kids (वयवर्षं ०५ ते १२)- QR ५०
Kids- वयवर्षं ०५ खालील- विनामूल्य
 
८) चित्रपटाची तिकिटे आसन क्रमांक आपणास वरील दिलेल्या संकेतस्थळावरूनच नोंद करावयाचे आहे.
 
९) या दिवशी आपण  “सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक पारंपरिक पोशाख” या स्पर्धेचे आयोजन केले असून पारितोषिके खालील प्रमाणे  असतील.
 
अ) सर्वोत्कृष्ट पोशाख पुरुष (वयवर्षं १२ आणि पुढील)
ब) सर्वोत्कृष्ट पोशाख स्त्री (वयवर्षं १२ आणि पुढील)
क) सर्वोत्कृष्ट पोशाख बालके (वयवर्षं ५ ते १२)
(वरील स्पर्धेसाठी आपले मंडळाचे सभासदत्व असणे बंधनकारक आहे).
 
१०) ज्या सभासदांनी आपले वाण घेतले नसल्यास त्यांनी कार्यक्रमाच्या दिवशी मनीष शहा (# ५५४३६५३७) यांना चित्रपटसभागृहांबाहेर चित्रपट चालू होण्याआधी संपर्क साधू शकता
 
११) मंडळाचे नवीन सभासदत्व अथवा नूतनीकरण करायचे असल्यास आपण mmqatar. com या संकेतस्थळावर वर जाऊन करावे.
 
सदस्यत्व शुल्क तपशील खालील प्रमाणे.
 
Family – Full Year renewal (QR १५०/-)
 
Bachelor – Full year renewal (QR ७५/-)
 
Family – Full year new (QR २००/-)
 
Bachelor – Full year new (QR १२५/-)
 
अधिक माहितीसाठी घेण्यासाठी खाली दिलेल्या समिती सभासदांना नमूद केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता.
 
१) श्री. संजय पाटील, अध्यक्ष # ३३१४६८३१
 
२) श्री. निलेश पार्सेकर, उपाध्यक्ष # ७०१४९५०४ (एझदान ६, अल वक्रा)
 
३) श्री. सुशांत सावर्डेकर, सचिव # ३३८२३७३८ (एझदान ३, अल वक्रा)
 
४) सौ. नम्रता तावडे, सह सचिव # ६६१६४३५७ (ऐन खालिद)
 
५) श्री. मनीष शहा, समिती सदस्य # ५५४३६५३७ (अलमुफ्ताह व्हिलेज, अल वक्रा)
 
६) श्री. राकेश वाघ, समिती सदस्य # ३३२०१६१५ (अल जजिरा कंपौंड, न्यू सलाता)
 
७) सौ. रचना चौधरी, समिती सदस्य # ५०८२६९५३ (एझदान २४, अल वक्रा)
 
८) श्री सिद्धेश झाडे, समिती सदस्य # ६६०४९६९० (एझदान २४, अल वक्रा)
 
९) श्री विक्रम देशमुख, समिती सदस्य # ३३२२१८१७ (एझदान ३१, अल वक्रा)
 
१०) श्री अमोल भोंगाळे, समिती सदस्य # ५०२५११७९ (अल हिलाल, दिल्ली लौंन्ड्री च्या बाजूला)
 
With Warm Regards,
 
Managing Committee 2021, 2022.
Maharashtra Mandal Doha, Qatar
 
E-mail :
 
Website:
 
Facebook Group:
@MaharashtraMandalQatar
Whatsapp # 50203931