समुद्रकिनारीची रात्र सफर आणि निसर्गरम्य दिवाळी पहाट “वाळवंटी दीपमेळा”- २०२१

सोनेरी प्रकाशात रात्र सारत पहाट आली!!!

सप्तसुरांची उधळण करत आली दिवाळी आली….

 

दिवाळी!!!!

दिव्यांची रोषणाई, फराळ, दारापुढे सुंदर रांगोळी, कंदील, किल्ले, फटाक्यांची आतिषबाजी आणि सगळ्यात महत्वाचे जिवलग मित्रपरिवार..

 

महाराष्ट्र मंडळ कतार कार्यकारणी समिती २०२१-२२ यावेळी आपणा सर्वांसाठी घेऊन येत आहे आगळीवेगळी दिवाळी……

समुद्रकिनारीची रात्र सफर आणि निसर्गरम्य दिवाळी पहाट

 

“वाळवंटी दीपमेळा”

 

स्थळ :- मिसाईद सीलाईन बीचच्याहीपुढे वाळवंटी सफर

दिनांक :- २५ आणि २६ नोव्हेंबर २०२१

वेळ:- २५ नोव्हेंबर गुरुवारी सायंकाळी ६ ते २६ नोव्हेंबर शुक्रवार सकाळी ११ वाजेपर्यंत

 

दर पुढीलप्रमाणे:-

· महाराष्ट्र मंडळ कतार सभासदांसाठी

१) प्रौढ (बारा वर्षापासून पुढे) १८० QAR

२) मुले (वयोगट ५ ते ११) १४० QAR

३) मुले (वयोगट ४ वर्षांखालील) विनाशुल्क

 

· महाराष्ट्र मंडळ कतारचे सभासदत्व नसलेल्या सर्वांसाठी दर

१) प्रौढ (बारा वर्षापासून पुढे) २४० QAR

२) मुले (वयोगट ५ ते११) २०० QAR

३) मुले (वयोगट ४ वर्षांखालील) विनाशुल्क

 

वरील सर्व दर हे प्रतिमानसी आहे.

आम्हाला आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की यावेळेस महाराष्ट्र मंडळाने वरील दर फक्त प्रवेशासाठी आकारण्यात आलेले आहेत. अल्पोपहार, रात्रीच्या जेवणाचे दर आणि अजून अनेक गोष्टीचे दर ह्याचा भार मंडळाकडून घेण्यात येणार आहे. आपल्याला कुठलेही अधिकतेचे दर हे आकारण्यात येणार नाही आहे.

सर्व इच्छुक सभासदांनी नाव नोंदणी करण्यासाठी खालील दिलेल्या गुगल फॉर्म वर आपली नोंदणी करावी.

नाव नोंदणीसाठी शेवटची दिनांक २० नोव्हेंबर २०२१ राहील.

 

नाव नोंदणी साठी येथे क्लिक करा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScmLKneCa3odVKcF_zRkO1nRu9Iyu6HBu57ZUbBjGuUjzIJIw/viewform?usp=sf_link

Non members साठी नाव नोंदणी ही दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी नंतर उघडण्यात येईल. शेवटची दिनांक २० नोव्हेंबर २०२१ राहील. त्यासाठी वेगळी लिंक पाठवण्यात येईल.

 

आपल्या पिकनिक स्थळी जाण्यासाठी 4X4 वाहनाची आवश्यकता आहे. त्यासाठीच मंडळाने सीलाइन बीच रिसॉर्ट बाहेरून संध्याकाळी ६ ते ७.३० पर्यंत Land cruiser वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सर्वानी वेळेवर उपस्थित रहावे. तसेच परत येताना सीलाईन बीच रिसॉर्ट पर्यंत Land cruiser ची व्यवस्था करण्यात आली आहे. तुम्ही तुमचे वाहन सीलाइन बीच रिसॉर्टच्या बाहेर पार्क करू शकता.

या वेळेव्यतिरिक्त वाहन उपलब्ध नाही. मात्र आपत्कालीन परिस्थितीसाठी camp owner वाहनाची व्यवस्था करेल.

 

सभासदांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या खेळांचे तसेच मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. अर्थातच दिवाळी म्हणजे रांगोळी, किल्ला बनवणे, आकाश कंदील बनवणे हे सगळे ओघाने आलेच. त्यासाठी लागणारे साहित्याची मंडळ व्यवस्था करेल.

या व्यतिरिक्त समुद्र किनारी लाटाच्या मंजूळ आवाजात, पक्षाच्या किलकीलाटांत मधुर गाण्याची दिवाळी पहाट ह्याचे आपण साक्षीदार होणार आहात आणि अतिशय विलक्षणीय अनुभवाची अनुभूती तुम्हाला आम्ही देणार आहोत. दिवाळी पहाट कार्यक्रमादरम्यान सर्वा सभासदांनी महाराष्ट्रीयन उत्सवी पेहराव धारण करावयाचे आहे. उत्कृष्ट पेहराव धारकाला Raffle coupon द्वारे पारितोषिक देण्यात येईल.

 

· महत्वाचे नियम:-

१) MMQ समितीने अपरिहार्य परिस्थितीमुळे किंवा प्रतिकूल हवामानामुळे रात्रीच्या कॅम्पिंग कार्यक्रमाच्या वेळापत्रकात कोणतेही बदल / रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे आणि त्यानुसार सर्व सहभागींना ते कळवले जाईल.

२) वरील लिंकवरील नोंदणी केल्यानंतर आपले सहभाग नोंदणी शुल्क खाली दिलेल्या समिती सभासदाकडे प्राप्त झाल्यानंतरच नोंदणी अधिकृत मानली जाईल. नोंदणी अधिकृत झालेल्याचा मेसेज आपल्याला Afaatrao #५०२०३९३१ या दूरध्वनीवरून पाठवण्यात येईल. तेव्हा हा क्रमांक आपल्या दूरध्वनी मध्ये save करावा तरच आपल्याला Afaatrao चा मेसेज प्राप्त होईल.

३) सर्व व्यक्तींनी कार्यक्रमाच्या सुनियोजनासाठी, यशस्वीतेसाठी आणि सुरक्षित अंमलबजावणीसाठी MMQ द्वारे प्रदान केलेल्या सर्व सूचना / मार्गदर्शक तत्त्वे / वेळापत्रकांचे पालन करावे.

४) संपूर्ण कार्यक्रमात कुठलेही मद्याचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. ह्या संदर्भात कुठलाही फ़ौजदारी गुन्हा दाखल झाल्यास त्यास मंडळ जबाबदार राहणार नाही आणि मंडळाकडून कुठलीही मदत केली जाणार नाही.

५) धूम्रपान ही नियोजित केलेल्या स्थानीच करण्यास परवानगी आहे.

६) MMQ समिती संपूर्ण कार्यक्रमादरम्यान कोणत्याही वैद्यकीय परिस्थिती, दुखापत, मौल्यवान वस्तूंचे नुकसान आणि कारचे नुकसान इत्यादीसाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.

७) सर्व सहभागींनी कतार देशाचे आणि पिकनिक स्थळाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे.

पोलीस गस्त घालणार्‍या अधिकार्‍यांना पिकनिक व्यक्तीकडून कोणतेही कायदेशीर उल्लंघन झाल्यास, त्याचे परिणाम कतार कायद्याप्रमाणे भोगावे लागतात. MMQ व्यक्तींच्या स्वकृतीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.

८) कार्यक्रमादरम्यान पोशाख धारण करताना आपला पोशाख हा कतारच्या पोशाख संस्कृतीचा आदर राखिल असा असावा.

९) कॅम्प साईटवर कतार आयडी (QID) सोबत ठेवावा अथवा वैध विजा प्रत (valid visa copy) सोबत ठेवावी.

१०) कॅम्प साईटवर थंडगार वातावरण असण्याची शक्यता आहे तेव्हा उबदार कपडे सोबत ठेवावे.

अधिक माहितीसाठी आणि आपले शुल्क जमा करण्यासाठी आपण पुढील MMQ समिती सदस्यांकडे संपर्क साधू शकता: –

 

१) श्री संजय पाटील (अध्यक्ष) # ३३१४६८३१ (इझदान ६, v-९१)

२) श्री निलेश पार्सेकर (उपाध्यक्ष) # ७०१४९५०४ (इझदान ६ बिल्डींग क्रमांक २ )

३) श्री सुशांत सावर्डेकर (जनरल सेक्रेटरी) # ३३८२३७३८ (इझदान ३ R-३२A)

४) सौ नम्रता तावडे (जॉईंट सेक्रेटरी) # ६६१६४३५७ (अल-अझिझिया)

५) श्री राकेश वाघ (समिती सदस्य) # ३३२९१६११ (दोहा क्रेझी सिग्नल )

६) श्री मनिष शहा (समिती सदस्य) # ५५४३६५३७ (अल मुफ्ता विलेज,बिल्डींग क्रमांक५७)

७) श्री विक्रम देशमुख (समिती सदस्य) # ३३२२१८१७ (इझदान ३१ ,बिल्डींग क्रमांक २०)

८) श्री सिद्धेश झाडे (समिती सदस्य) # ६६०४९६९० (इझदान २४, R-१९C )

९) सौ रचना चौधरी (समिती सदस्य) # ५०८२६९५३ (इझदान २४, R-७८A )

 

चला तर मग मंडळी प्रथमच एका आगळ्या वेगळ्या व स्वप्नवत दिवाळी उत्सवाचे म्हणजेच “वाळवंटी दीपमेळा” चे साक्षीदार होऊया !!!

 

Managing Committee 2021, 2022

Maharashtra Mandal Qatar,

Doha,Qatar.

E-mail : qatarmmq@gmail.com

Website: www.mmqatar.com

Facebook Group: @MaharashtraMandalQatar
Whatsapp # 50203931