*नमस्कार मंडळी!🙏*
*महाराष्ट्र मंडळ कतार, कार्यकारिणी समिती २०२१-२०२२, घेऊन येत आहे आपला सर्वांचा आवडता उपक्रम,*

 *”चैत्रमास-२०२२”* 

*मंडळी, प्रदीर्घ कोविड काळातून जरा उसंत मिळत आहे त्यामुळे कार्यकारिणी समितीने यावर्षीच्या चैत्रमास साठी कुठल्याही थीमचा आग्रह न धरण्याचे ठरविले आहे. तरीही आपल्या संस्कृतीला साजेसे सादरीकरण अपेक्षीत असून कतार च्या प्रचलित नियंमांचे पालन करणे आवश्यक असेल.  तर मंडळी, या वर्षी आपण आपली सादरीकरणे म्हणजेच नृत्ये, अभिनय तसेच थीमॅटिक ॲक्ट या आपल्या ठरलेल्या श्रेणीतील कोणत्याही  कार्यक्रमाची बांधणी करताना भारतीय संस्कृति नुसार कार्यक्रम करावेत अशी अपेक्षा आहे, ज्यात महाराष्ट्रीयन तसेच इतर प्रांतीय नृत्य, गायन, वादन प्रकारांबरोबरच ,शास्त्रीय  नृत्यप्रकारांचा समावेश करता येऊ शकेल. या बरोबरच यंदा आपण भारताचा तसेच महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास, संस्कृती यांचं दर्शन आपल्या वैविध्यपूर्ण पेहरावातून करू शकता. ह्या कलाविषयां व्यतिरिक्त ही इतर कलाविष्कार दिलेल्या कलाकृती-यादी अंतर्गत आपण करू शकता.*
*यंदाच्या चैत्रामासात सर्व श्रेणीच्या चैत्रमास कार्यक्रमात मराठी हिंदी गाणी स्विकारण्यात येतील याची नोंद घ्यावी.*
 *कार्यक्रमाची रूपरेषा:-*

*चैत्रमास-२०२२*

*दिनांक: १३ मे, २०२२*

*वेळ: दुपारी ०१.३० पासून*

*ठिकाण: डी. पी. एस. स्कूल सभागृह, अल-वक्रा*

https://goo.gl/maps/ZuyvhDpmKkUUuZDw5

*प्रवेश: विनामूल्य  (फक्त सभासदांसाठी) (Only for MMQ Members)*
*चैत्रमास-२०२२” मध्ये समाविष्ट असणाऱ्या कलाप्रकारांची यादी खालील नमूद करण्यात आली आहे. ( खाली दिलेली attachment पाहावी ).*
*सर्व इच्छुक सभासदांनी नाव नोंदणीपूर्वी नमूद केलेल्या सर्व नियम व अटी वाचूनच आपल्या सहभागाची नोंदणी करावी. अपूर्ण माहितीसहित पाठविलेली नावे नोंदणीग्राह्य धरली जाणार नाहीत याची सर्व सभासदांनी नोंद घ्यावी.*
*नियम व अटी:*
१. *नावनोंदणीसाठी गूगल फोर्म ची लिंक mmqatar.com या website वर दिनांक ०९ एप्रिल, २०२२  रोजी सायंकाळी, ठीक ७.०० वा.* *उपलब्ध करण्यात येईल. कार्यकारिणी समितीच्या e-mail वर अथवा समिति सदस्याकडे पाठवलेली entry स्विकारली / ग्राह्य धरली जाणार नाही.*
२. *वर नमूद केल्याप्रमाणे चैत्रमास – २०२२ मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक सभासदाचे MMQ चे वर्ष – २०२२  चे सभासदस्यत्व असणे अनिवार्य आहे. आपण आपले सदस्यत्व खाली दिलेल्या संकेस्थळावरून करू शकता.*
(अधिक माहितीसाठी संपर्क: – अफाटराव ५०२०३९३१ (messages only) / श्री. सुशांत सावर्डेकर ३३८२३७३८/ सौ. रचना चौधरी ५०८२६९५३)
३. *कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणीची अंतिम तारीख ११ एप्रिल २०२२, असेल.* या तारखेनंतर येणारी कोणतीही नावनोंदणी स्विकारण्यात येणार नाही.
४. प्रत्येक सभासद जास्तीत जास्त २ सादरीकरणामध्ये सहभागी होऊ शकतो, परंतु ही दोन्ही सादरीकरणे एकाच उप-श्रेणीतील नसावीत याची सर्वांनी नोंदणीपूर्व दखल घ्यावी (Each participant is allowed to perform in any TWO performances, however, note that these two performances should not fall under the same sub-Category).
५. प्रत्येक श्रेणीतील सादरीकरणाची वेळ ही नमूद केलेल्या वेळ मर्यादेपेक्षा जास्त नसावी. यासाठी आवश्यक सुधारणा आपल्याला कळविली जाईल. सादरीकरणाची  वेळ जास्त असल्यास, सादरीकरण रद्द करण्याचे अधिकार मंडळाकडे असतील.
६. सादरीकरणामध्ये सादर केल्या जाणाऱ्या गाण्याची/ नृत्यप्रकाराचीची पुनरावृत्ती झाल्यास प्रथम प्रवेश नोंदवणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही उप श्रेणीत गाण्याची पुनरावृत्ती झाल्यास आपल्याला गाणे बदलण्यास सांगितले जाईल.
७. सूत्रसंचालनामध्ये सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा :-सूत्रसंचालनामध्ये सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी १८ वर्षे असणे अनिवार्य आहे. चैत्रमासात नेहमीप्रमाणे सूत्रसंचालन करणाऱ्या सभासदास प्रथम प्राधान्य  देण्यात येईल. इच्छूक सूत्रसंचालकाला / सूत्रसंचालिकेला इतर कुठल्याही सादरीकरणामध्ये भाग घेता येणार नाही.
८. *चैत्रमास – २०२२  या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व सभासदांच्या सादरीकरणाची पाहणी सादरीकरणाच्या पोशाखात(dress rehearsal) व गाण्यासह ( final song) कार्यकारिणी समिती २१ आणि २२ एप्रिल २०२२ रोजी करेल.* सादरीकरणामध्ये काही बदल करण्याचे तसेच कार्यक्रमाचा क्रम ठरवण्याचे सर्व हक्क कार्यकारिणी समितीकडे असतील.
९. कार्यक्रमात सादर होणारी सर्व सादरीकरणे ही सुसभ्य, स्थानिक परंपरा लक्षात ठेऊन सादर करावीत, तसेच स्थानिक Customs व Protocol याच्या बाहेरील नसावीत याची सर्व सहभागी होणाऱ्या सभासदांनी नोंद घ्यावी.
१०. आपल्या नोंदणीची पोचपावती (acknowledgement) ही निश्चिती(Confirmation) म्हणून विचारात घेऊ नये. वर नमूद केलेले सर्व नियम लक्षात घेऊन कार्यकारिणी समिती २३ एप्रिल २०२२ पर्यंत प्रवेशाची पोचपावती करेल , व  निश्चिती(Confirmation) चा ई-मेल २४, २५ एप्रिल २०२२ पर्यंत करेल अथवा आपल्या प्रवेशामध्ये काही बदल सुचवेल.
११. ज्या समूहाने महाराष्ट्र मंडळाकडून Embassy, ICC अथवा कुठल्याही Apex Body मध्ये वर्ष २०२१, २२ मध्ये सादरीकरण केले असेल अश्या समूहाला तेच सादरीकरण करण्यासाठी वाइल्ड कार्ड एन्ट्रीची (Wild Card Entry) मुभा दिली जाईल आणि अश्या निवडीबाबतचे सर्व निर्णय कार्यकारिणी समितीकडे अबाधीत राहतील.
१२. *आपण निवडलेली गाणी MP4 फॉरमॅट मध्ये १७ एप्रिल २०२२  पर्यंत mmqreg@gmail.com या ई-मेल वर मंडळाकडे देणे अनिवार्य आहे.  MP4 ट्रॅकची गुणवत्ता उत्कृष्ट असणे गरजेचे आहे. तसेच MP4 ट्रॅकची वेळ ही सादरीकरणाच्या नियोजित वेळेपेक्षा अधिक असल्यास कार्यकारिणी समिती MP4  ट्रॅक संकलित(edit) करावयास सांगू शकते. १९ एप्रिल २०२२  नंतर MP4 ट्रॅकमधे बदल स्वीकारले जाणार नाहीत.* 
१३. ज्या सभासदांना समूह सादारीकरणामध्ये इच्छा आहे आणि समूह सहकारी शोधण्यात काही अडचणी असतील त्यांनी मंडळाला त्या संदर्भात *mmqreg@gmail.com* वर ई-मेलद्वारे संपर्क करावा.
१४. ज्यांनी मंडळाचे कौटुंबिक सभासदस्यत्व वर्ष २०२२ घेतले असतील आणि ज्यांनी आपले वाण घेतले नसतील ते सर्व सभासद वाणासाठी पात्र असतील आणि त्यांनी चैत्रमासाच्या दिवशी वाण घेण्यासाठी वैयक्तिक हजर राहून आपले वाण घेऊ शकता. १५. कुठल्याही सादरीकरण सहभागी इच्छुकांनी वैद्यकीयदृष्ट्या निरोगी असणे अत्यावश्यक आहे. त्यास मंडळ कुठेही जबाबदार राहणार नाही.
१६. *चैत्रमास २०२२ प्रवेशिका क्रम ठरवण्याचे सर्व अधिकार हे महाराष्ट्र मंडळ कार्यकारिणी समिती २०२१, २२ यांच्याकडे राहतील.* 
१७. *सर्व सादरीकरणाची वयोमर्यादा ही कमीत कमी ५ वर्षे आणि पुढील असल्यामुळे ५ वर्षा खालील मुलाची नाव नोंदणी करू नये.*
१८. कार्यक्रमास उपस्थित सर्व श्रोत्यांना आपले COVID Booster Dose Vaccination certificate आणि green Ehtraz सुरक्षारक्षकांना दाखवणे अनिवार्य आहे. ते नसल्यास आपणास सुरक्षारक्षक प्रवेश नाकारू शकतात आणि यास मंडळ कुठेही जबाबदार राहणार नाही.
१९. ह्या चैत्रमासातील उत्कृष्ट प्रवेशिकेला या वर्षी”Azadi Ka Amrut Mahotsav” हया Embassy आणि ICC उपक्रमामध्ये देखील सहभाग करून घेता घेईल. ह्याचा निर्णय घेण्याचे अधिकार महाराष्ट्र मंडळ कतार समिती २०२१, २२ कडे अभादीत राहील. नोदविण्याआधी वर नमूद केलेले सर्व महत्वाचे मुद्दे काळजीपूर्वक वाचावेत ही नम्र विनंती.
अधिक माहितीसाठी आपण महाराष्ट्र मंडळ कार्यकारिणी समिती सदस्यांना खाली नमूद केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता.
१) श्री. संजय पाटील, अध्यक्ष # ३३१४६८३१
२) श्री. निलेश पार्सेकर, उपाध्यक्ष # ७०१४९५०४ (एझदान ६, अल वक्रा)
३) श्री. सुशांत सावर्डेकर, सचिव # ३३८२३७३८ (एझदान ३, अल वक्रा)
४) सौ. नम्रता तावडे, सह सचिव # ६६१६४३५७ (ऐन खालिद)
५) श्री. सागर माणगांवकर, खजिनदार # ६६९०१२३२ (एझदान २१, अल वक्रा)
६) श्री. मनीष शहा, समिती सदस्य # ५५४३६५३७ (अलमुफ्ताह व्हिलेज, अल वक्रा)
७) श्री. राकेश वाघ, समिती सदस्य # ३३२०१६१५ (अल जजिरा कंपौंड, न्यू सलाता)
८) सौ. रचना चौधरी, समिती सदस्य # ५०८२६९५३ (एझदान २४, अल वक्रा)
९) श्री सिद्धेश झाडे, समिती सदस्य # ६६०४९६९० (एझदान २४, अल वक्रा)
१०) श्री विक्रम देशमुख, समिती सदस्य # ३३२२१८१७ (एझदान ३१, अल वक्रा)
११) श्री अमोल भोंगाळे, समिती सदस्य # ५०२५११७९ (अल हिलाल, दिल्ली लौंन्ड्री च्या बाजूला)
With Warm Regards,
*Managing Committee 2021 & 2022*
*Maharashtra Mandal Doha,Qatar.*
*Website:* www.mmqatar.com
*FacebookGroup:* @MaharashtraMandalQatar
*Whatsapp#* 50203931